कोकण

आचरा सोसायटी परिसरात बिबट्या

CD

आचरा सोसायटी
परिसरात बिबट्या
आचरा ः येथील रामेश्वर विकास सोसायटी परिसरात आज दुपारी बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
आज दुपारी अनुष्का मुननकर यांना मुख्य रस्त्यावरून चालत जाणारा बिबट्या दिसला. त्यांनी तत्काळ सासरे गणपत मुननकर यांना माहिती दिली. याच वेळेत विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलच्या आवाजाने बिबट्याने दिशा बदलली आणि नितीन कृष्णा गावकर यांच्या घराच्या परिसरातून झेप घेत तो पसार झाला. घटनास्थळी गावकर यांच्या घराजवळ बिबट्याच्या पावलांचे ठसेही स्पष्ट दिसून आले. भर दिवसा वस्तीमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांनी भीती व्यक्त केली असून वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी सोसायटीतील इतर रहिवासीही उपस्थित होते.

चिंदर गावामधील
डाळपस्वारीला प्रारंभ
आचरा ः चिंदर गावची पारंपरिक देव डाळपस्वारीला काल (ता.२७) पासून प्रारंभ झाला. शतकानुशतके चालत आलेली ही धार्मिक परंपरा ४ डिसेंबरपर्यत सुरु असणार आहे. काल श्री देव रवळनाथ मंदिरातून डाळपस्वारीचे प्रस्थान झाले. पुढे सातेरी मंदिर, विठलादेवी दर्शन घेऊन रात्री उशिरा श्री आकारी ब्राह्मण देव मंदिर येथे मुक्काम करण्यात आला. आज सायंकाळी आकारी ब्राह्मण देव मंदिरातून निघून चिंदर बाजार मार्गे श्री देवी पावणाई मंदिरात प्रवेश झाला. येथे पुढील तीन दिवस व तीन रात्र विसावा असणार आहे. १ डिसेंबरला सायंकाळी पावणाई मंदिरातून प्रस्थान होऊन रात्री उशिरा श्री रामेश्वर मंदिरात आगमन होईल. ४ डिसेंबरला श्री भगवती माऊली देवीचा यात्रोत्सव आणि दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. रात्री श्री दत्त मंदिरातील पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर, श्रींची स्वारी सातेरी मंदिर मार्गे वाजतगाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत श्री रामेश्वर मंदिरात पोहोचेल. त्यानंतर मोठ्या जनसमुदायासह रात्री उशिरा भगवती माऊली मंदिरात आगमन होईल. भाविकांना या पवित्र डाळपस्वारीचा मनोभावे लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

COVID-19 Vaccine Side Effects : कोविड-१९ लसीचे दुष्परिणाम आणि नुकसानभरपाईबाबत ठोस धोरण तयार करा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा! सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाला...

Aadhaar Card Correction : सावधान! आधार कार्डच्या 3 किरकोळ चुकांमुळे बंद होऊ शकते तुमचे बँक खाते; लगेच करून घ्या 'हा' बदल

Ichalkaranji Latest Crime : इचलकरंजीच्या तारदाळमधील दर्गा चौकात राजकीय वाद उफाळला, थेट चाकूने छाती, पोटावर वार केले अन्

Chef Kunal Kapoor: डाएट करताय पण तेच ते बेचव खाऊन कंटाळा आलाय? मग शेफ कुणाल कपूरची फायबर रिच मिलेट खिचडी आजच ट्राय करा

SCROLL FOR NEXT