रत्नागिरीची वाटचाल हुकूमशाहीकडे
राजेश सावंत ः नागरिकांच्या प्रश्नांकडे नगरसेवकांची पाठ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : कोण कोणाच्या सोबत गेला म्हणून त्याला लगेच फोन करून पक्षीय आदेश काढले जातात. ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे, विधानसभेची नाही; परंतु गेल्या पाच ते सात वर्षांत नागरिकांच्या प्रश्नांकडे नगरसेवकांची पाठ फिरल्याचे दिसते शिवाय काहींच्या आदेशांमुळे रत्नागिरीची वाटचाल हुकूमशाहीकडे होत असल्याची टीका माजी उपनगराध्यक्ष व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.
सावंत यांची कन्या शिवानी मिहिर माने या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर विवा हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले की, जनतेला नागरी सुविधा मिळत नाहीत व पुढील नगराध्यक्ष, नगरसेवकांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, याकरिता पत्रकार परिषद घेतली आहे.
सावंत म्हणाले, गेल्या काही वर्षांत रत्नागिरीत हुकूमशाही वाढताना दिसते आहे. निवडणूक आली की, काही लोकांची झोपडपट्टी उठवू, गांजा कोण विकतोय, त्यांची नावे माहिती आहेत, असे जाहीर सभेमध्ये सांगितले जाते. जर तुम्हाला नावे माहिती असतील तर ती पोलिसांना सांगा. नवलाई देवळाच्यासमोर झोपडपट्टी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बसणाऱ्या व्यक्तींना निवडणूक लढवू नये म्हणून धमकावले गेले. परवा एका ज्येष्ठ व्यक्तीचे निधन झाले म्हणून काहीजणांसोबत तिथे गेलो होतो; पण भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हुकूमशहांकडून फोन गेले की, माझ्या गाडीतून जाऊ नका, हे योग्य नव्हे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.