कोकण

खेड- महावितरणची ७० वसुली पथके तैनात

CD

खेडमधील पाच उपविभागात
सात कोटींची थकबाकी
महावितरणकडून ७० पथकाद्वारे वसुली मोहीम
खेड, ता. २८ : शहरासह ग्रामीण परिसरातील पाच उपविभागांच्या वीजग्राहकांकडे तब्बल ७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या दरम्यान, केवळ खेड उपविभागातच दीड कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक असून, ही रक्कम वसूल करण्याचे मोठे आव्हान महावितरणसमोर उभे ठाकले आहे.
थकबाकी वसुलीस गती देण्यासाठी महावितरणने ७०हून अधिक विशेष वसुली पथके तैनात केली आहेत. ही पथके थकबाकीदारांच्या घरोघरी जाऊन त्वरित बिल भरण्याच्या सूचना देत आहेत. काही ग्राहकांना वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने या मोहिमेला अधिक कडक वळण देण्यात आले आहे. ग्राहकांना देयक भरणा करण्यासाठी समुपदेशन, सूचना व नोटिसा देण्याचे काम या पथकांमार्फत सुरू आहे.

चौकट
पाच महिने अगोदरच मोहीम सुरू
साधारणतः दरवर्षी मार्च महिन्यात वसुली मोहीम राबवली जाते; मात्र यंदा पाच महिने अगोदरच महावितरणने मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांकडून देयक भरण्यात होत असलेल्या कुचराईमुळे महसूल संकलनावर परिणाम होत असल्याने ही मोहीम तातडीने हाती घेण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT