कोकण

तीन वन्समोअरने दिला आयुष्याला ताल

CD

-rat२९p४.jpg-
२५O०७३५७
पावस ः गोळप कट्टा येथील कार्यक्रमात आपल्या जीवनाचा प्रवास उलगडणारे किरण बोरसुतकर.
-------------

गोळप कट्टा---लोगो

‘तीन वन्समोअर’ने दिला आयुष्याला ताल
किरण बोरसुतकर ः सलग २६ स्पर्धांमध्ये पहिला क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २९ ः सहावीत केलेल्या पहिल्या सादरीकरणाला मिळालेला ‘तीन वेळा वन्समोर’चा सन्मान याच क्षणाने रत्नागिरीतील डान्सर किरण बोरसुतकर यांच्या आयुष्याला नवा ताल दिला. चढ-उतार, संघर्ष, घसरण आणि पुन्हा उभारी या सर्वांतून त्यांनी नृत्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
गोळप कट्टा येथील कार्यक्रमात किरण बोरसुतकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यामध्ये त्यांनी नी आपल्या नृत्यप्रवासाचा मागोवा सांगितला. अप्पू राजामधील गाण्यावर सहावीत केलेल्या परफॉर्मन्सने त्यांना डान्सची आवड निर्माण झाली. शाळेतील जोशी सर आणि मुजुमदार सर यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी स्पर्धांमध्ये चमक दाखवली. ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्यावर मोटारसायकलसह केलेली एन्ट्री त्यांच्या नावावर सलग २६ स्पर्धांमध्ये पहिला क्रमांक घेऊन आली.
मुलगा शौर्यच्या जन्मानंतर केरळ राष्ट्रीय कला महोत्सवात महाराष्ट्राच्या टीमचे नेतृत्व मिळाले. दूरदर्शन व मराठी वाहिन्यांच्या शोमध्येही त्यांच्या टीमने यश मिळवले. दुसऱ्या मुलाचे नाव त्यांनी आपल्या प्रेरणास्थानावरून रेमो ठेवले.
कोरोनाकाळात डान्स थांबला तरी भाजी-मासेविक्री, जेवण पार्सल, ऑनलाईन क्लासेस अशा कामातून त्यांनी संघर्ष केला. सध्या ‘दुडूदुडू’, ‘मिसेस श्रावण क्वीन’, ‘डान्स विथ आई’ असे लोकप्रिय इव्हेंट आयोजित करतात. अॅकॅडमीला २४ वर्षे पूर्ण होत असून मुलगा शौर्य हा जिल्ह्यातील पहिला झुम्बा इन्स्ट्रक्टर आहे.
किरण बोरसुतकर म्हणतात, नृत्य हेच माझं आयुष्य आणि पुढची पिढीही त्याच लयीत नाचते आहे, हेच समाधान. लहानपणापासून माझा स्वभाव खोडकर होता. अभ्यासापेक्षा मस्ती करण्यात मजा वाटायची. त्या काळात बेंजोची क्रेझ होती काही कार्यक्रम असला तर बॅन्जो हमखास असायचा. त्यातील गाण्यावर थिरकायला नाचायला आवडायचे सहावीत असताना कमल हसनच्या अप्पूराजा या चित्रपटातील आया हे राजा लोगो रे लोगो या गाण्यावर डान्स केला. त्या वेळेला त्या डान्सकरिता तीनवेळा वन्समोर मिळाला. तेव्हापासून डान्स करण्याची आवड निर्माण झाली, तेव्हापासून आतापर्यंत ती आवड जोपासली.
-------
चौकट
शेकडो विद्यार्थ्यांना दिशा
कथ्थकच्या तीन परीक्षा दिल्यानंतर वेस्टर्न नृत्याकडे लक्ष केंद्रित करत चेतन उत्तेकरसोबत सी.के. ग्रुप स्थापन केला. स्पर्धांतील घसरणीनंतर मित्राच्या सल्ल्याने २००३ मध्ये किरण डान्स अॅकॅडमी सुरू केली. आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना दिशा दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT