कोकण

शेतकरीहित ओळखून योजना राबवा

CD

07360

शेतकरीहित ओळखून योजना राबवा

प्रेमानंद देसाई ः दोडामार्गात पाणी फाउंडेशनतर्फे प्रशिक्षण शिबिर

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३० : पाणी फाउंडेशने शेतकऱ्यांच्या हितार्थ हाती घेतलेले कार्य अतुलनीय आहे. त्याची दखल पंतप्रधानांनी देखील घेतली आहे. जल संधारण आणि पाणलोट व्यवस्थापन करण्यासंदर्भात जे प्रशिक्षण दिले जाते, त्याचबरोबर कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या गरजा जाणून घेऊन त्यादृष्टीने अभ्यास केल्यास शेतकरी निश्चितच सधनतेची वाट चालेल, असे प्रतिपादन आत्मा कमिटी अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी केले.
पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील तहसीलदार कार्यालयात पाणी फाउंडेशनतर्फे ‘फार्मर कप’साठी खरीप हंगामात पिके घेणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांसाठी एकदिवशीय प्रशिक्षण पार पडले. यावेळी श्री. देसाई बोलत होते. ते म्हणाले, ‘पूर्वी तालुक्यात वायंगणी शेती मोठ्या प्रमाणात केली जायची. नदी, ओढ्यावर बांध घालून पाणी अडविले जायचे आणि ते पाटाच्या सहाय्याने शेतीपर्यंत नेले जात असे. अशा प्रकारे पूर्वी वायंगणी शेती केली जात होती; परंतु ती आता लोप पावत चालली आहे. ही शेती पुन्हा फुलवण्यासाठी नदी, ओढे, नाल्यावर बंधारे घातले गेले पाहिजेत, तरच वायंगणी शेतीची पुनरावृत्ती होईल. शेतकऱ्यांना जागृत करायचे असेल तर आपल्याकडे असणारा फंड प्रायोगिक तत्वावर वापरला पाहिजे, तरच शेतकऱ्याची उन्नती होईल. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना साधने उपलब्ध करून दिली पाहिजेत.’
एकपीक पद्धतीचे शेतकरी गट तयार करणे, शेतकऱ्यांनी एकजुटीने शेती करणे, निविष्ठा खरेदी करणे, तांत्रिक निकषाच्या मार्गदर्शनाखाली शेतीतील कामे केली तर निश्चितपणे शेतीच्या मशागत आणि उत्पादनावरचा खर्च कमी होईल व शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल, याबाबतचे मार्गदर्शन हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. तहसीलदार राहूल गुरव, उपविभागीय कृषी अधिकारी (सावंतवाडी) अनिकेत कदम, तालुका कृषी अधिकारी सौरभ कदम, पाणी फाउंडेशन विभागीय समन्वयक प्रशांत गवंडी उपस्थित होते. मंडल कृषी अधिकारी प्रकाश घाडगे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT