-rat२९p२.jpg-
P२५O०७३५५
धनंजय रहाटवळ
--------
गिम्हवणेतील छोट्या गाळ्यातून जागतिक मंचावर
‘प्रांजल पाँलीमर्स’ची कहाणी ; रहाटवळ यांची मेहनत, दूरदृष्टी
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २९ ः तालुक्यातील ताडील सुरेवाडी या लहानशा गावात रुजलेले उद्योगाचे एक छोटे रोप आज जगभर फुलून सुगंध पसरवत आहे. धनंजय कृष्णा रहाटवळ यांची अखंड मेहनत, अढळ चिकाटी आणि दूरदृष्टीपूर्ण विचारसरणीच्या बळावर त्यांच्या प्रांजल पाँलीमर्स या ब्रँडने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शालेय शिक्षणानंतर आटीआय मुंबई आणि त्यानंतर एल अॅण्ड टी कंपनीतील मशीन शॉप डिप्लोमा पूर्ण केल्यावर धनंजय रहाटवळ यांनी काही काळ उद्योगक्षेत्रात अनुभव घेतला आणि नंतर आपल्या जन्मभूमी दापोलीत परतण्याचा निर्णय घेतला. २००६ मध्ये, आझादवाडी-गिम्हवणे येथे एका छोट्याशा गाळ्यामधून त्यांनी सेफ्टी फ्लेंज गार्डस् बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. प्रारंभच्या कठीण काळात गावातील शांताराम धोंडू पवार, सुनील धोंडू पवार, शंकर दाजी शिगवण तसेच उद्योग शेत्रातील राजेंद्र भोसले यांसारख्या जेष्ठांचा सहकार्याचा हात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. दिवस-रात्र अथक परिश्रम, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची जिद्द आणि गुणवत्तेप्रती निष्ठा या जोरावर त्यांनी ‘प्रांजल पाँलीमर्स’ ब्रँडला भारतभरात अग्रस्थान मिळवून दिले. आज वळणे येथे त्यांच्या दोन कंपन्या कार्यरत आहेत. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, गोवा, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांत या कंपनीने विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.
दापोली-रत्नागिरीसारख्या छोट्या गावातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचणारी ही पहिली कंपनी ठरली, ही दापोलीसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांना संचालक असलेल्या पत्नी श्रुती धनंजय रहाटवळ, मुलगी प्रांजली आणि मुलगा प्रज्वल यांचा सातत्याने पाठिंबा मिळाला. यामुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
---
चौकट
परदेशातही निर्यात
या कंपनीमार्फत थायलंड, इंडोनेशिया, जपान, अबुधाबी, दुबई, सिंगापूर, व्हीऐतनाम, सौदी अरेबिया, फिलीपाईन्स, कुवेत, दक्षिण आफ्रिका अशा अनेक देशांमध्येही उत्पादने निर्यात केली जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.