‘कबनूरकर’मध्ये
संविधान दिन
साखरपा ः येथील श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. या वेळी चित्रकला, पोवाडा गायन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात शाळेचे शिक्षक अमित पंडित यांनी विद्यार्थ्यांना संविधान आणि संविधान दिनाची माहिती सांगितली. ज्येष्ठ शिक्षिका शिल्पा होनाळे, शर्वरी सुतार तसेच अन्य शिक्षिकांनी हे पूजन केले. या वेळी सर्व विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ देण्यात आली. चित्रकला, रंगभरण तसेच पोवाडा गायन या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कोंडगावात बचतगट
इमारतीचे भूमिपूजन
साखरपा ः कोंडगाव येथे प्रस्तावित बचतगटाच्या इमारतीचे भूमिपूजन प्रभारी सरपंच श्रद्धा शेटये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हे भूमिपूजन करण्यात आले. कोंडगाव येथील जिल्हा परिषदेच्या जागेत उमेद अभियान स्वयंसहाय्यता बचतगट आदर्श प्रभाग संघ दाभोळे बचत गटासाठी नवीन इमारत मंजूर करण्यात आली आहे. यात दिशा ग्रामसंघ आणि समृद्धी ग्रामसंघ यांचाही समावेश आहे. विकासकामात आणि महिला सक्षमीकरणाला गती मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. ही इमारत मंजूर व्हावी यासाठी नेत्रा शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले होते. या वेळी माजी सरपंच बापू शेटये, ग्रामपंचायत सदस्य दीप्ती गांधी, स्वरदा केतकर, गटविकास अधिकारी शिंदे, रूपेश कदम, स्वप्नील बारगुडे आदी उपस्थित होते.
ज्ञानगंगा वाचनालयाच्या
अध्यक्षपदी चव्हाण
लांजा ः तालुक्यातील कोंडगे येथील ज्ञानगंगा वाचनालयाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी काशिनाथ चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी कोंडगे येथील विद्यालयात ग्रंथालयाचे कार्यवाह म्हणून बरीच वर्षे काम केले आहे. यामुळे अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी उपाध्यक्ष म्हणून कृष्णा चव्हाण, कार्यवाह हरेश जाधव, खजिनदार म्हणून पंढरी गुरव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून श्रीधर विश्वासराव, रमाकांत चव्हाण, विष्णू जाधव, पुंडलिक बेर्डे, सूर्यकांत कदम, अपेक्षा कदम, अनुराग जाधव यांची पुढील पाच वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.