कोकण

पैसे वाटण्याचा प्रकार किळसवाणा

CD

०७३९०

पैसे वाटण्याचा प्रकार किळसवाणा

विनायक राऊत ः जिल्हा संपुष्टात येण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २९ ः पैसे वाटपाच्या बातम्या ऐकून कीव करावीशी वाटते. ज्या लोकसभा मतदारसंघात प्रा. मधू दंडवते, बॅ. नाथ पै यांनी कर्तृत्व निर्माण केले, त्या जिल्ह्यात १० ते १२ हजार मताला दिले जात आहेत. मत विकत घेण्याची जी स्पर्धा लागली आहे, त्यातून जिल्हा संपुष्टात येत आहे. ही लोकशाहीची हत्या आहे, अशी टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी येथे केली.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, तालुकाप्रमुख यशवंत ऊर्फ बाळू परब, ठाकरे शिवसेनेचे नगराध्यक्ष उमेदवार संदेश निकम, माजी जिल्हा परिषद सदस्या सुकन्या नरसुले, तालुका महिला संघटिका साक्षी चमणकर, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण आयनोडकर, उपजिल्हा संघटक विजय जाधव, मिलिंद नाईक, गणेश धुरी, शहरप्रमुख शैलेश परुळेकर, उमेश नाईक, महादेव काजरेकर उपस्थित होते.

राऊत म्हणाले, ‘येथील नगराध्यक्षपदासाठी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संदेश निकम हे सातत्याने विक्रमी मतांनी नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. त्यांचे शहर विकासात मोठे योगदान आहे, हे जनसामान्यांना माहिती आहे. संदेश निकम यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले आहेत. भाजपचे आताचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, त्यांच्या मागच्या कारकिर्दीत आम्ही मार्केटसाठी करोडो रुपये दिले; मात्र आता त्याची दुरवस्था झाली आहे. स्वतःच्या टक्केवारीने खिसे भरले आहेत. तीच गत शिंदे गटाची आहे.’
ते म्हणाले, ‘जिल्ह्यातील प्रामाणिक कार्यकर्त्याला लोकशाहीचे दरवाजे कायमचे बंद करण्याचे काम भाजप व शिंदे गटाने केले आहे. लोकसभेत १३० कोटी खर्च करण्यात आले. सात लाख मतदारांना सरासरी २ हजार वाटले. त्यावर काही झाले नाही. त्यामुळे एकदा पचलेले पाप पुन्हा केले जाते आहे. यात प्रामाणिक कार्यकर्ता भरडला जातोय.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar: गंगापूरजवळ कंटेनरची दुचाकीला भीषण धडक; शेंदूरवादा येथील तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

Latest Marathi News Live Update : कुडाळच्या पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विक्रीचा पर्दाफाश

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कहर ! 'या' जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अनेक भागांत उष्णतेची लाट

Pune lifestyle Diseases: जीवनशैलीच्या आजारांचा तरुणाईला ‘संसर्ग’; पुण्यातील ७५ हजार जणांना उच्च रक्तदाब, ४४ हजार मधुमेहाच्या विळख्यात!

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे दोन हप्ते एकत्र? महिलांना मिळू शकतात थेट ३००० रुपये, पण पैसे नेमके कधी येणार?

SCROLL FOR NEXT