07464
भगवद्गीता अध्याय पाठांतर स्पर्धेस प्रतिसाद
वाडा प्रशालेचा उपक्रम; विविध गटांमध्ये मिहीर, कौस्तुभ, स्वरा प्रथम
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० : वाडा (ता.देवगड) येथील अ. कृ. केळकर हायस्कूलमध्ये घेतलेल्या श्रीमद्भगवद्गीता अध्याय पाठांतर स्पर्धेत तिसरीपर्यंतच्या बालगटात मिहीर जोशी, चौथी ते सातवीच्या गटात कौस्तुभ जोशी तर आठवी ते दहावीच्या गटात स्वरा सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
नीता नीळकंठ दीक्षित स्मरणार्थ दीक्षित फाउंडेशन प्रायोजित श्रीपाद काळे स्मृती श्रीमद्भगवद्गीता अध्याय पाठांतर स्पर्धा प्रशालेच्या तात्या भिडे सभागृहात निरंजन दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. व्यासपीठावर भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, अनिता आगाशे, श्रीकृष्ण घाटे, शाळा समिती अध्यक्ष हर्षद जोशी, स्थानीय समिती अध्यक्ष शांताराम पुजारे, स्थानीय समिती कार्यवाह दिनकर जोशी, मुख्याध्यापिका स्मिता तेली, अभिषेक गोगटे, परीक्षक अरुण सोमण, उल्का जोशी आदी उपस्थित होते. हर्षद जोशी यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची पूर्वपीठिका तसेच श्रीपाद काळे यांच्या कार्याचा सन्मान केला.
डॉ. देवधर, श्री. दीक्षित, अरुण सोमण, सौ. जोशी, श्री. घाटे, श्रद्धा लिमये, आरती ओगले, मंजिरी गोखले, प्रज्ञा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेतील सर्वात छोटी स्पर्धक श्रीशा गोखले (वय ३ वर्षे) हिला विशेष गौरविण्यात आले. स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे असा, बालगट (तिसरीपर्यंत)-मिहीर जोशी, शौनक वेलणकर, युक्ता बाक्रे, उत्तेजनार्थ-वरद जोशी. चौथी ते सातवी-कौस्तुभ जोशी, श्रीमा प्रभुदेसाई, सारा परब, उत्तेजनार्थ पराग लिमये. आठवी ते दहावी-स्वरा सावंत, राज्ञी कुलकर्णी, रामचंद्र सातवळेकर, उत्तेजनार्थ प्रांजली कानेटकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.