कोकण

सावर्डेत संविधान दिनी चित्रकला, प्रश्नमंजुषा स्पर्धां

CD

rat30p15.jpg-
O07579
सावर्डे : संविधान दिनानिमित्त येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.

सावर्डेत संविधान दिनी
चित्रकला, प्रश्नमंजुषा स्पर्धां
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ३० : भारतीय संविधान दिनानिमित्त सावर्डे येथील गोविंदराव निकम विद्यालयात संविधान जनजागृती फेरी, संविधान उद्देशिकेचे साखळी वाचन, उद्देशिकेची शपथ, चित्रकला स्पर्धा, सेल्फी पॉईंट तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
सावर्डेत २६ रोजी काढलेल्या संविधान जनजागृती फेरीत विद्यार्थ्यांनी हातात फलक, घोषणा व माहितीपर संदेश घेत संविधान मूल्यांची जनजागृती केली. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे साखळी वाचन व शपथ घेऊन विद्यार्थ्यांनी लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प केला. तसेच संविधानावर आधारित चित्रकला स्पर्धेत इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थ्यांनी कलात्मकता व संविधानाची मर्मस्थाने यांचा सुंदर संगम सादर केला. या स्पर्धेत इयत्ता आठवी ‘क’ मधील वसुधा जयस्वाल प्रथम, नववी मधील मुक्ता भुवड द्वितीय तर आठवी ‘ड’ मधील आदिती सुवरे तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
दूर्वा घाणेकर हिने उत्तेजनार्थ पुरस्कार मिळवून विशेष कामगिरी केली. विद्यार्थ्यांच्या या सुंदर व सुबक चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेत इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थ्यांनी संविधानातील विविध कलमे, हक्क, कर्तव्ये, भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्ये यांवर आधारित प्रश्नांना उत्तरे देताना विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय ज्ञानाचा परिचय करून दिला. या स्पर्धेत ‘केतकी’ गट विजयी तर ‘फाईव्ह स्टार’ गट उपविजेते ठरले. विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले. या स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन नेहा मिस्त्री यांनी केले. संविधान दिनाच्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दलची जागरूकता, अभिमान आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना विद्यालय परिसरात व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gas Cylinder Shortage : अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद; भाविकांच्या अन्नाचा प्रश्न ऐरणीवर, प्रसादाचा लाडू सुद्धा बंद

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT