कोकण

खाऊचे रॅपर डस्टबिनमध्येच टाकणार

CD

खाऊचे रॅपर डस्टबिनमध्येच टाकणार
विद्यार्थ्यांचा निर्धार ; गिम्हवणेतील शाळेत कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ३० ः आम्ही खाऊ खाल्ल्यानंतर रॅपर टाकण्यासाठी डस्टबिनचाच वापर करणार, चॉकलेटचे कागद टाकणार नाही, असा निर्धार गिम्हवणे जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी केला.
गिम्हवणे जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा येथे पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रशांत परांजपे यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. प्लास्टीक निर्मूलन आणि पर्यावरण संवर्धन या विषयावर परांजपे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. परांजपे यांनी बालगोपाळांना हसत खेळत आनंददायी संवादातून विविध उदाहरणे ते गदिमांच्या बिन भिंतीची शाळेत नेत निसर्ग वाचायला शिकवला. या विद्यार्थ्यांचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांसह नागरिकांनी घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांनी जास्तीत बीज संकलन करावे असे सांगतानाच जास्तीत जास्त बी संकलन करणाऱ्या विद्यार्थांना बक्षीसेही जाहीर केली. तसेच आजपासून प्लास्टीक कॅरी बॅगचा बालहट्ट करणार नाही, असे शाळेने ठरविल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापिका सुरेखा दामले-कारखेले यांनीही मार्गदर्शन केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेणारा आनंददायी पर्यावरणीय खेळ झाल्यानंतर वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सुनील राठोड यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

SCROLL FOR NEXT