कोकण

माजगावात गुरुवारी दत्त जयंती सोहळा

CD

माजगावात गुरुवारी
दत्त जयंती सोहळा
सावंतवाडी ः माजगाव येथील श्री दत्त मंदिरात गुरुवारी (ता. ४) दत्तजयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. गुरुवारी (ता. ४) पहाटे ५ ते दुपारी १ या वेळेत लघुरुद्र, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, सार्वजनिक एकादशणी आदी धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी पाचला ढोल-ताशांच्या गजरात श्रींची पालखी मिरवणूक निघेल. ही मिरवणूक माजगाव ते सावंतवाडी बाजारपेठ व तेथून जुन्या मुंबई-गोवा मार्गाने परत माजगावातून मंदिराकडे येणार आहे. सायंकाळी सहापासून रात्री दहापर्यंत विविध भजन मंडळांची भजने, १० ते ११ या वेळेत सुश्राव्य कीर्तन, बाराला दत्तजन्म सोहळा व आरती होणार आहे. शुक्रवारी (ता. ५) सकाळी सातपासून विविध धार्मिक कार्यक्रम, ९ वाजता ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा नामजप, दुपारी साडेबाराला महाआरती, एकला महाप्रसाद होईल. भाविकांनी दत्तजयंती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुरुदेव दत्त देवस्थान, माजगाव यांनी केले आहे.
..................
वायरीत शुक्रवारी
संगीत कार्यक्रम
मालवण ः वायरी-भूतनाथ येथे दत्त जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी साडंसातला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील दत्तभक्त प.पू. ताई वेंगुर्लेकर रंगमंचावर भावपूर्ण भक्तिगीतांचा गायक जितेंद्र मेस्त्री यांचा ‘झाली स्वामीकृपा झाली’ हा सुरेल संगीत कार्यक्रम सादर होणार आहे. त्यांना संगीत साथ हार्मोनियमसाठी अक्षय परुळेकर, तबला-पंकज पाटील, पखवाज-सुधीर गोसावी हे करणार आहेत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भूतनाथ नूतन नाट्य समाज, वायरी भूतनाथतर्फे करण्यात आले आहे.
.....................
‘फोंडाघाट दूरक्षेत्रावर
जादा कर्मचारी नेमा’
कणकवली ः फोंडाघाट गावातील पोलिस दूरक्षेत्र गेले काही महिने केवळ एका कर्मचाऱ्याच्या भरवशावर सुरू आहे. त्यातही या कर्मचाऱ्याची अन्यत्र ड्युटी लागल्यास आणि साप्ताहिक सुटीमुळे आठवड्यातील तीन-चार दिवस ही पोलिस चौकी बंद असते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. परिसरातील तंटे, अपघात, वाहतूक कोंडी, नागरिकांच्या तक्रारी यासाठी दूरक्षेत्रावर कोणीही हजर नसते. त्यामुळे नागरिकांना कणकवली पोलिस ठाण्यात फेऱ्या माराव्या लागतात. या पोलिस चौकीवर जादा कर्मचारी नेमण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
---
वायरीत गुरुवारी
‘अखेरचा सवाल’
मालवण ः वायरी भूतनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दत्तजयंती उत्सवानिमित्त भूतनाथ नूतन नाट्य समाजातर्फे गुरुवारी (ता. ४) रात्री दहाला वसंत कानेटकर लिखित, पप्या कद्रेकर दिग्दर्शित कौटुंबिक दोन अंकी नाटक ‘अखेरचा सवाल’ होणार आहे. नाट्यरसिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
.......................
सिंधुदुर्ग जिल्ह्यात
पुन्हा हुडहुडी
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात थंडीचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे आंबा, काजू उत्पादकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली होती. त्यामुळे आंबा, काजू कलमांना मोहोर फुटू लागला होता; मात्र गेले काही दिवस ढगाळ वातावरण व तापमान वाढल्याने थंडी गायब झाली होती. आता पुन्हा थंडीचा जोर वाढल्याने बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी आज भारतीय संघाची घोषणा, कुणाला संधी, कोण बाहेर? 'या' पाच प्रश्नांची मिळणार उत्तरं...

BMC Elections: देशातील हिंदू 1992 पुन्हा घडवण्यासाठी तयार... BMC निवडणुकीपूर्वी धीरेंद्र शास्त्रींचं मुंबईत वक्तव्य! राजकीय अर्थ काय?

हत्तींच्या कळपाला राजधानी एक्सप्रेसची भीषण धडक, ५ डबे रुळावरून घसरले; ८ हत्तींचा मृत्यू

India T20 World Cup Squad Announcement: शुभमन गिलच्या स्थानाला 'या' खेळाडूकडून धोका; SMAT मध्ये १० सामन्यांत चोपल्यात ५१७ धावा, ५१ चौकार अन् ३३ षटकारांचा पाऊस

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिकेच्या जागावाटपावर महायुतीत तणाव. मंत्री हसन मुश्रीफ २५ जागांवर ठाम; ३३-३३-१५ फॉर्म्युला अमान्य

SCROLL FOR NEXT