कोकण

साडवली-देवरूख शहराचा कायापालट करून दाखवू

CD

देवरूख शहराचा कायापालट
करून दाखवूः नेहा माने
जनसामान्यांना बदल हवा
साडवली, ता. ३०ः देवरूख शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा विकास आराखड्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. त्यामुळे शहराची अवस्था बिकट झाली आहे. हे चित्र बदलण्यासाठी महाआघाडीच्या हाती सत्ता द्या. रखडलेला शहराचा विकास आराखडा मंजूर करून देवरूखचा कायापालट केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या नेहा रवींद्र माने यांनी केले.
देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सौ. माने यांनी महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली. नगरपंचायत निवडणुकीत जनसामान्यांना बदल हवा आहे. हे प्रचारादरम्यान स्पष्ट दिसत आहे. नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवारांना देवरूख शहरवासीयांची पहिली पसंती दिसत असल्याने शहरवासीय महाआघाडीच्याच हाती सत्ता देतील, असा आत्मविश्वास सौ. माने यांनी व्यक्त केला.
शहराला स्वतंत्र फिडर नसल्याने सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा, जलशुद्धीकरण केंद्राजवळ असलेल्या अस्ताव्यस्त कचऱ्याचे ढीग, यामुळे दूषित पाणी पुरवठा होवून शहरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मुठभर लोकांचे हित साधणारा करोडो रुपये खर्च करून शहरातील डम्पिंग ग्राऊंड प्रकल्पात झालेला भ्रष्टाचार, नियोजनाअभावी निर्माण झालेली कचऱ्याची समस्या, प्रारूप विकास आराखड्याचे रखडलेले काम, उखडलेले रस्ते आदी विविध समस्यांमुळे देवरूख शहर त्रस्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT