कोकण

चिपळूण-ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या फोटोचा गैरवापर

CD

ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या फोटोचा गैरवापर
निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार ; राष्ट्रवादीकडून विनापरवाना प्रतिमांचा वापर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिमांचा परवानगीशिवाय प्रचारासाठी वापर केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार शनिवारी (ता. २९) लेखी अर्जाद्वारे सादर करण्यात आली. हा अर्ज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव उर्फ बाळा कदम, तालुका प्रमुख बळीराम गुजर आणि शहर प्रमुख सचिन उर्फ भैय्या कदम यांच्या स्वाक्षरीसह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यांच्यामते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या काही उमेदवारांकडून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तसेच शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत यांच्या प्रतिमांचा विनापरवाना प्रचारात वापर केला जात आहे. हा प्रकार खोडसाळ, दिशाभूल करणारा असून निवडणूक आचारसंहितेचे थेट उल्लंघन करणारा आहे.
चिपळूण पालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात कोणतीही आघाडी किंवा अधिकृत युती नाही. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असताना शिवसेना नेत्यांचे फोटो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकाराची तत्काळ दखल घेऊन संबंधित उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी शिवसेनेकडून निवडणूक अधिकाऱ्यांना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT