रमेश कदम पालकमंत्र्यांचे डमी उमेदवार
लियाकत शाह ; दोन महिन्यापूर्वीच बैठकीत निर्णय
चिपळूण, ता. २९ ः युतीचे उमेदवार उमेश सकपाळ व आघाडीचे उमेदवार हे पालकमंत्र्याच्या सुचनेनुसारच पालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सकपाळ हे मुख्य उमेदवार तर कदम हे डमी उमेदवार आहेत. या दोघांपैकी जो निवडून येईल, त्यांच्या पाठीशी पालकमंत्री उभे राहणार आहेत. याविषयी दोन महिने आधीच बैठका झाल्या. त्याचवेळी आपल्याला निवडणुकीतून बाद करण्याचा डाव रचला गेला. काही कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांचाही हात असल्याचा आरोप नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार लियाकत शाह यांनी पत्रकार परिषदेत केला.
शहरातील पेठमाप येथील सभेत आघाडीचे उमेदवार रमेश कदम यांनी शाह यांना लक्ष्य केले. त्याला उत्तर देताना शाह म्हणाले, गेली अडीच वर्षे नगराध्यक्षपदासाठी मी प्रयत्न करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकाशी संपर्क साधून काम करत आहे. मात्र आता निवडणुकीत आपल्या उमेदवारीमुळे विरोधकांना अडचण निर्माण झाली. यातून त्यांनी एकत्रीत येऊन आपल्याला निवडणुकीतून बाद करण्याचा डाव रचला. रत्नागिरी पाली येथे सुरवातीच्या बैठका झाल्या. त्यानंतर चिपळुणातही एक दोन बैठका घेण्यात आल्या. त्यामध्ये युतीकडून सकपाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना रमेश कदम यांच्या डमी उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.