कोकण

साडवली-देवरुखात मनसेची रिक्षा-दुचाकी रॅली

CD

देवरुखात मनसेची
रिक्षा-दुचाकी रॅली
साडवली, ता. ३० ः देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसेने शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी रिक्षा/बाईक रॅली काढण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, अशा घोषणा देत देवरूख शहरातून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीला मनसेसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रॅलीची सुरुवात देवरुखची ग्रामदेवता सोळजाई देवीचा आशीर्वाद घेऊन करण्यात आली. यानंतर ही रॅली सोळजाई मंदिरपासून गुरववाडी, नेहरूनगर, मुस्लिम मोहल्ला, भोईवाडी, भंडारवाडी, माणिक चौक, मातृमंदिर चौक, डी कॅड कॉलेज, माणिक चौक, खालची आळी, ग्रामीण रुग्णालय, स्टेट बँक रोड, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दिनोदय वस्तू भांडारमार्गे पोलिस कवायत मैदान अशी काढण्यात आली. रॅलीत मनसेचे संपर्क अध्यक्ष श्रीपत शिंदे, मनविसेचे संपर्क अध्यक्ष दिनेश मांडवकर, नेते जितेंद्र चव्हाण, मनसे तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर, मनविसे शहराध्यक्ष ऋतुराज देवरुखकर, अमित चव्हाण, देवेंद्र चव्हाण आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT