07625
पणदूर संविता आश्रमास साहित्य
बांदा ः दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजाप्रती बांधिलकीची भावना जपत मित्रमंडळींसह मुकेश खोबरेकर व शामराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील संविता आश्रमास भेट देऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. आश्रमातील बंधू-भगिनींसमवेत दोघांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. संदीप नार्वेकर, विक्रांत नेवगी, गजानन पावसकर, शेर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य श्याम सावंत, रोहिदास कळंगुटकर, नंदेश खोबरेकर आदी उपस्थित होते. खोबरेकर आणि मित्रपरिवाराने दिलेल्या मदतीबद्दल आश्रम संचालकांनी आभार व्यक्त केले. दैनंदिन वापरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य व विविध साहित्य यावेळी आश्रमास प्रदान करण्यात आले. या कार्यात साईनाथ धारगळकर, भाऊ वळंजू, सिद्धेश वेंगुर्लेकर, जयंत महाबळ, दयानंद नेवगी, निवेदिता शॉ, विक्रमी मांडवेकर, अमोल भांबुरे, विराज नेवगी, रविकिरण म्हावळणकर, दिगंबर खामकर, राजेश चव्हाण, प्रशांत सावळ यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.