कोकण

राजापूर-राजापुरात एकाच दिवशी अडीचशे बंधारे

CD

rat३०p२१.jpg-
07638
राजापूरः येथे पाणी साठा करण्यासाठी महिलांनी श्रमदानातून बंधारे बांधले आहेत.
--------------
राजापुरात एकाच दिवशी अडीचशे बंधारे
लोकसहभागाने पूर्तता; २० लाखाची बचत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३०ः एप्रिल-मे महिन्यातील संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याच्या उद्दिष्टपूर्ती करण्याच्यादृष्टीने पंचायत समितीने लोकसहभागातून एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘एक दिवस बंधाऱ्यासाठी’ या उपक्रमांतर्गंत तालुक्यामध्ये लोकसहभागातून एकाचदिवशी तब्बल अडीचशेहून अधिक बंधारे बांधण्यात आले आहे.
मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही तालुक्याला दरवर्षी एप्रिलपासून पाणीटंचाईला सामारे जावे लागते. मात्र, यावर्षी उशीरापर्यंत पाऊस लागत होता. लांबणीवर पडलेल्या या पावसामुळे दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी उशीरा पाणीटंचाईची झळ पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेवून पंचायत समितीतर्फे तालुक्यामध्ये गावा-गावांमध्ये वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे. गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे बांधण्याच्या उद्दिष्टपूर्तीकडे तालुक्यातील ग्रामपंचायतींनी एक पाऊल पुढे टाकले आहे. या उपक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आदी सहभागी झाले होते. लोकसहभाग आणि श्रमदानातून बांधण्यात आलेल्या या बंधार्‍याच्या बांधकामावर खर्च होणार्‍या सुमारे वीस लाख रूपयांची बचत झाली आहे.
--------
चौकट
दृष्टीक्षेपात राजापूर

१०१ ग्रामपंचायती
लोकसहभागातून एक हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट
एकाच दिवशी २५० हून अधिक बंधारे बांधून पूर्ण
बंधार्‍यात पाणीसाठा मुबलक
पाणीटंचाईच्या काळात ठरणार उपयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी केली पूर्ण बंद, जहाज पेटवून देण्याचा इशारा; तेलाच्या किंमतीचा भडका उडणार, आशियाई देशांना फटका

Supreme Court: न्यायाधीशांनी AI चा वापर करून लिहिला निकाल, अस्तित्वातच नसलेल्या खटल्यांचा संदर्भ; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

India Ministry Meeting : युद्धाचा भडका! भारतीय वाणिज्य, उद्योग मंत्रालयाची बैठक, देशातील दिग्गज आले एकत्र; अनेक विषयांवर चर्चा

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाने तेलदरात उसळी

SCROLL FOR NEXT