कोकण

मुळदेत मत्स्य प्रशिक्षणाला प्रतिसाद

CD

07659

मुळदेत मत्स्य प्रशिक्षणाला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३० ः सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे ‘शेत-तळ्यातील मत्स्य संवर्धन’ विषयावर तीनदिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच झाला. महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत अकोले (जि. अहिल्यानगर) येथे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर शेततळे बांधलेले आहेत. शेततळ्यातील पाण्याचा सिंचनासोबत मत्स्यशेतीकरिता उपयोग व्हावा, म्हणून या प्रकल्पात सहभागी ३२ शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
या तीनदिवसीय प्रशिक्षणादरम्यान ‘शेततळ्यातील मत्स्य शेती : सद्यस्थिती व भविष्य तसेच मत्स्य-शेती प्रकल्प अहवाल’विषयी डॉ. केतन चौधरी यांनी, तर माशांचे रोग व व्यवस्थापन याविषयी डॉ. आसिफ पागरकर यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय विविध विषयांवर प्रा. नरेंद्र चोगले, डॉ. वैभव येवले, डॉ. राकेश जाधव, वर्षा सदावर्ते, अपूर्वा सावंत, डॉ. हरीश धमगाये, कृपेश सावंत, सुशील कांबळे, प्रा. सचिन साटम, रत्नागिरी जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी लतिका गावडे, मत्स्य विकास अधिकारी शिवराज चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचा समारोप डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. नितीन सावंत, सागर कुवेसकर, डॉ. आसिफ पगारकर, प्रा. सचिन साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्रशिक्षण पुस्तिकेचे विमोचन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सावंत, डॉ. चौधरी यांनी प्रशिक्षणाचा वापर करून प्रगती साधण्याचे आवाहन केले. अपूर्वा सावंत यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. साटम यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Government Job Fraud : एकाच वेळी दोन-दोन सरकारी नोकऱ्या करत होता पठ्ठ्या, ३३ वर्षे घेतला पगार; कोर्टाने सुनावली ७ वर्षांची शिक्षा

हे, भाऊ शोभतात! बांगलादेशचे दोन्ही फलंदाज एका दिशेला, पाकिस्तानच्या खेळाडूंनी काय केलं पाहा Video Viral

Government Stray Dog Policy : शिकवायचं की कुत्री मोजायची? आता भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर? सरकारचा अजब फतवा, काय आहे नेमका प्लॅन?

Latest Marathi News Live Update : एलपीजी गॅस सिलेंडर टंचाईची झळ आता गडचिरोली शहराला

स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट, म्हणाल्या...'गेली दोन वर्ष मी...'

SCROLL FOR NEXT