कोकण

कळणेतील शिबिरात ४३ जणांचे रक्तदान

CD

swt3021.jpg
07667
कळणे ः मनोगत व्यक्त करताना कळणे सरपंच अजित देसाई. बाजूला डॉ. अभिषेक कांबळे, बाबली गवंडे व इतर मान्यवर.

कळणेतील शिबिरात
४३ जणांचे रक्तदान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः श्री माऊली बॉईज, कळणे यांच्या सहकार्यातून आज आरोग्य उपकेंद्र कळणे येथे झालेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरात महिला रक्तदात्यांसहित एकूण ४३ दात्यांनी रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांचे ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
कळणे गावाच्या इतिहासातील हे पहिलेच रक्तदान शिबिर ठरले. कळणेसहित मोरगाव, झरेबांबर, कुडासे, फोंडये, भरपाल, वानोशी या गावांतील रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेत सहभाग दर्शविला. कळणे सरपंच अजित देसाई, गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अभिषेक कांबळे, श्री माऊली बॉईजचे सर्व पदाधिकारी तसेच ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे सचिव बाबली गवंडे आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी सिद्धू परब, बाळानंद देसाई, संकेत देसाई, केदार भिसे, दत्ताराम नाईक, गिरीश नार्वेकर, संदेश देसाई, पुरुषोत्तम देसाई, सरपंच देसाई, डॉ. मनोज सावंत, सौरभ डेगवेकर, योगेश देसाई आदींनी मेहनत घेतली. उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, रश्मी राऊळ, अनिल खाडे यांनी रक्तसंकलन केले. सरपंच देसाई यांनी ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT