कोकण

खेड-खेड न. प. च्या सभागृहात होणार मतमोजणी

CD

खेड नगर पालिकेच्या सभागृहात होणार मतमोजणी
२० मतदान केंद्रांचा समावेश, १०० हून अधिक कर्मचारी
खेड, ता. ३० : नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १० प्रभागातील २० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदान केंद्रांवर १०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या सभागृहातच मतमोजणीची प्रक्रिया होणार असून यासाठी नगरप्रशासनाने सुसज्जता ठेवली आहे. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जादा पोलिसांची कुमक तैनात करून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुधीर सोनावणे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरप्रशासनाने आवश्यक ती तयारी केली आहे. यावेळी १७ जागांऐवजी २० जागांवर उमेदवार रिंगणात आहेत. ३ जागा वाढल्याने मतदान केंद्रेही वाढली आहेत. या निवडणुकीत १३,९९५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ७,४७५ महिला, तर ६,५०० पुरुष मतदारांचा समावेश आहे. १० प्रभागांमध्ये २०, मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १ साठी क्षेत्रपालनगर येथील जिल्हा परिषद शाळा क्र. २ येथे २ मतदान केंद्रे असणार आहेत. प्रभाग क्रमांक २ साठी अलमदिना वेल्फेअर असोसिएशन संस्थेच्या नवीन इमारतीत २ मतदान केंद्रांचा समावेश आहे. प्रभाग क्र. ३ चाही याच इमारतीत समावेश असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सुप्रीम कोर्टात अचानक तणाव; सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले... तरुण वकिलाने नेमकं काय केलं?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आज 1 तोळा सोन्याचा दर किती? पाहा ताजे भाव

‘शाका लाका बूम बूम’मधला संजू झाला बाबा; सोशल मीडियावर केली 'खास' पोस्ट, नेटकरी म्हणाले...'छोटा संजू आता पुन्हा...'

Latest Marathi News Live Update : आखाती तणावाचा परिणाम; हॉटेल व्यवसायिकांना गॅस सिलेंडरचा तुटवडा

Pune News: मतदारांना धमक्या! मतपत्रिका कोरी द्या, अन्यथा नोकरीला मुकाल; ‘मसाप’साठी आमदार, नगरसेवकही सक्रिय..

SCROLL FOR NEXT