कोकण

पोदार इंटरनॅशनल स्कूल प्रथम

CD

- rat१p१.jpg -
P२५O०७७२३
रत्नागिरी : देशभक्तिपर समूहगायन स्पर्धेत प्रथम विजेता पोदार इंटरनॅशनल स्कूलचा संघ गीत सादर करताना.

देशभक्तिपर समूहगायन स्पर्धेत
पोदार इंटरनॅशनल स्कूल प्रथम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विभाग, राष्ट्रीय सेवा समिती आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देशभक्तिपर समूहगीत गायन स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. भारतीय संविधान दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय सेवा समितीचे गजानन करमरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा माधवराव मुळ्ये सभागृहात पार पडली. यामध्ये एकूण ९ संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत पोदार स्कूलने प्रथम, दामले विद्यालयाने द्वितीय तर मानेज् इंटरनॅशनल स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला. बाबूराव जोशी गुरुकुल आणि फाटक हायस्कूल या दोन संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण राम तांबे, मंगेश मोरे आणि स्वरदा जोशी यांनी केले. संस्कार भारतीचे अध्यक्ष हेरंब जोगळेकर, सचिव आनंद पाटणकर यांच्यासह श्वेता जोगळेकर, अलका बेंदरकर, यशोदीप कयाळ तसेच सेवा समितीचे अनिरुद्ध लिमये यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. स्पर्धेदरम्यान राष्ट्रीय सेवा समितीच्या ऋची महाजन यांनी संविधान दिनाबद्दल मार्गदर्शन केले. सहभागी संघांच्या व्यवस्थापकांनीही स्पर्धा आणि संविधानाबद्दल मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझ्यावर टाकलेली धाड कटकारस्थानातून: शहाजी पाटील; पालकमंत्री अन् माजी आमदाराबाबत माेठे वक्तव्य, अश्रू अनावर !

Winter Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा आलू मेथी पराठा, सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 02nd December 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 December 2025

घोरण्याची समस्या

SCROLL FOR NEXT