कोकण

सृष्टी तांबे, आदित्य लिमये अंतिम फेरीत

CD

- rat१p५.jpg -
P२५O०७७२७
रत्नागिरी ः अभंग गायन स्पर्धेचे विजेते सृष्टी, आदित्य आणि स्वराला गौरवताना सचिन तेली, अमित भोसले आणि राम पानगले.
---
सृष्टी तांबे, आदित्य लिमये अंतिम फेरीत
स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव ; अभंग गायन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : श्री स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित श्रीमद्संजीवनी गाथेतील अभंग गायन राज्यस्तरीय स्पर्धेची रत्नागिरी केंद्राची प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली. यामधून सृष्टी तांबे आणि आदित्य लिमये या दोघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.
श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस आणि स्वराभिषेक-रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्राथमिक फेरी येथील गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर पार पडली. स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून, स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगांचा प्रचार आणि प्रसार सर्वदूर व्हावा या उद्देशाने ही स्पर्धा राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, अकोला, रत्नागिरी अशा सहा केंद्रांवर घेतली जाते. रत्नागिरीतील केंद्रावर एकूण २८ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून सृष्टी तांबे हिने प्रथम, आदित्य लिमयेने द्वितीय तर स्वरा भागवतने तृतीय क्रमांक पटकावला. त्यापैकी सृष्टी आणि आदित्य हे दोघे पावस येथे स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मसोहळ्यादरम्यान होणाऱ्या अंतिम फेरीत दाखल झाले. स्पर्धेचे परीक्षण गोवा येथील प्रसिद्ध गायक सचिन तेली आणि ज्येष्ठ तबलावादक अमित भोसले यांनी केले, तर साथसंगत केदार लिंगायत, पुष्कर सरपोतदार (तबलासाथ), मंगेश मोरे, महेश दामले, चैतन्य पटवर्धन (संवादिनीसाथ), अद्वैत मोरे, विश्वास सनगरे (तालवाद्य) यांनी केली. एस. कुमार साउंडचे उदयराज सावंत यांनी ध्वनिसंयोजन केले. प्राथमिक फेरीतील विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. गगनगिरी महाराज आश्रमाचे व्यवस्थापक राम पानगले आणि त्यांच्या सहकाऱ्याचे स्पर्धेकरिता विशेष सहकार्य लाभले. श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे जयंतराव देसाई यांच्यासह स्वामीभक्त रसिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेची अंतिम फेरी स्वामींच्या जन्मोत्सवादरम्यान १२ डिसेंबरला पावस येथे समाधी मंदिरात होणार असून, यामध्ये एकूण सहा केंद्रांवरील १२ विजेते स्पर्धक सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

SCROLL FOR NEXT