- rat१p९.jpg-
P२५O०७७५७
पिंपरी चिंचवड येथे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्या उपस्थितीमध्ये तर, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते डॉ. अनिकेत मयेकर यांना मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला
---
डॉ. अनिकेत मयेकर यांना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषद ; स्टेथोस्कोप ललित लेखसंग्रहाची निवड
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १ ः साहित्यक्षेत्रातील महत्त्वाचा मान समजला जाणारा महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा आयोजित वाङ्मय पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याचे साहित्यवैभव वाढवणारे आणि हर्चे गावचे डॉ. अनिकेत मयेकर यांना त्यांच्या स्टेथोस्कोप या ललित लेखसंग्रहासाठी उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. मयेकर यांच्या प्रकाशित झालेल्या पहिल्याच पुस्तकाला हा सन्मान लाभला आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाने मराठी साहित्य वर्तुळात त्यांची नोंद घेतली गेली आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवारी (ता. ३०) सकाळी १०.३० वा. महाराष्ट्र साहित्य परिषद शांता शेळके सभागृह, संत तुकाराम संकुलात झाला. या महत्त्वपूर्ण सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी भूषवले तर, ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते डॉ. अनिकेत मयेकर यांच्यासह इतर पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले आहे. कादंबरी, कथा, कविता, ललित आणि बालसाहित्य या पाच साहित्य विभागातील सर्वोत्कृष्ट लेखकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्चे गावच्या मातीतील साहित्यिक प्रतिभा असलेले सुप्रसिद्ध डॉ. अनिकेत मयेकर यांनी ‘सोनचाफा’ प्रकाशनाच्या आपल्या ललित लेखनाच्या या पहिल्याच संग्रहाने अशाप्रकारे मराठी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या लेखनाची नोंद घेत त्यांना ललित लेखन विभागासाठी प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. पहिल्याच प्रयत्नात इतका मोठा सन्मान मिळवल्यामुळे त्यांचे साहित्यक्षेत्रातील भविष्य उज्ज्वल असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या या यशाने कोकणच्या साहित्य परंपरेचा मान राज्यस्तरावर उंचावला आहे. सर्व साहित्यिक वर्तुळातून त्यांचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.