कोकण

चिपळुणात प्रचार थंडावला, वातावरण तापले

CD

चिपळुणात प्रचार थंडावला, वातावरण तापले
११७ उमेदवार रिंगणात ; डिजिटल प्रचारावर जोर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ः नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा प्रचार आज थंडावला असला तरी राजकीय वातावरण तापले आहे. नगराध्यक्षपदासाठी ७ आणि नगरसेवकपदासाठी ११०, असे एकूण ११७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश कदम आणि शिंदे सेनेचे माहितीचे उमेदवार यांच्यामध्ये आहे.
महाविकास आघाडीकडून राजू देवळेकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. काँग्रेसकडून सुधीर शिंदे तर अपक्ष म्हणून लियाकत शहा रिंगणात आहेत तसेच माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोसले यांचीही उमेदवारी कायम आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी गल्लीमोहल्यात राजकीय वातावरण तापले आहे. पक्षाच्या अधिकृत चिन्हांमुळे राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना प्रचारात नैसर्गिक आघाडी मिळाली आहे; मात्र अपक्ष उमेदवारांची चिन्हे नवीन असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. उमेदवारांचे चेहरे ओळखीचे आहेत; पण चिन्ह लक्षात राहत नाही, अशी प्रतिक्रिया अनेक मतदार व्यक्त करत आहेत. निवडणूक चिन्हाची ओळख प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवणे अपक्ष उमेदवारांना अडचणीचे ठरले आहे शिवाय चिन्ह मिळाल्यानंतर लगेचच जाहिरात पत्रके छापणे, ती संपूर्ण प्रभागात वितरित करणे आणि मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, हे सर्व अत्यंत कमी कालावधीत करावे लागत असल्याने त्यांची अक्षरशः तारांबळ उडाली होती. उमेश सकपाळ यांचा प्रचार करण्यासाठी अखेरच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे नेते चिपळूणमध्ये सभेसाठी आले. पालकमंत्र्यांनी बैठका घेतल्या. रमेश कदम यांच्या प्रचारासाठी भास्कर जाधव मैदानात उतरले. उर्वरित उमेदवारांना स्वतः आणि कार्यकर्त्यांकडूनच प्रचार करून घ्यावा लागला. घराघरात पत्रके आणि निवडणूक चिन्ह पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले. उमेदवारांनी प्रचारसभा आणि बैठका घेतल्या. वाडीवस्तीतील महत्त्वाच्या नेत्यांबरोबर गाठीभेटी घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. काही उमेदवारांनी रिक्षावरून लाऊडस्पीकरने आपल्या चिन्हांचा प्रचार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गॅस पुरवठा ठप्प! मंंत्र्यांच्या भत्त्यात कपात, हॉटेल्स बंद; भारतासह जगभरात इंधन टंचाईची भीती, पाकिस्तानवर लॉकडाऊनची वेळ

Maharashtra financial Crisis: राज्यावर कर्जाचा बोजा वाढला, प्रत्येक नागरिकावर ८५ हजार २७८ रुपयांचे कर्ज..

शेअर बाजाराला युद्धझळा! कच्चे तेल महागले, गॅसची टंचाई; रुपयाची घसरगुंडी, सोनं झालं स्वस्त

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या रामकुंडात चपला आणि कपडे फेकाफेकी प्रकरणावर गुन्हा दाखल

Pune Accident: बारामती जळगाव येथील राज्यमार्गावरील भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको!

SCROLL FOR NEXT