rat1p18.JPG
07803
रत्नागिरी ः जागतिक एड्स दिनानिमित्त येथे आरोग्य विभागाकडून दुचाकी फेरी काढण्यात आली होती.
----------
जागतिक एड्स दिनानिमित्त
रत्नागिरी येथे दुचाकी फेरी
रत्नागिरी, ता. १ ः महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था व जिल्हा शासकीय रुग्णालयांतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्यामार्फत जागतिक एड्स दिनानिमित्त शहरात दुचाकी फेरी काढण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी हिरवा झेंडा दाखवून फेरीस सुरुवात झाली. फेरी सिव्हिल हॉस्पिटल येथून जयस्तंभमार्गे साळवीस्टॉप व पुन्हा मारुती मंदिरमार्गे सिव्हिल हॉस्पिटल येथे समारोप झाला. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव कांबळे, रक्तपेढी अधिकारी डॉ. अर्जुन सुतार, एआरटी वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी आठल्ये, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन पाटील उपस्थित होते. एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त एड्सविषयी जनजागृती व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून एचआयव्ही तपासणीस प्रोत्साहित करणे, या उद्देशाने या फेरीचे आयोजन केले होते.
कार्यक्रमात एचआयव्हीच्या जागरूकतेसंबंधी शपथ घेण्यात आली. अडथळ्यांवर मात करून एकजुटीने, वाटचाल एड्स संपवण्याच्या दिशेने, एचआयव्ही एड्सला लढा देऊ, नवपरिवर्तन घडवू हे या कार्यक्रमाचे घोषवाक्य होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.