07824
भाजपला घाबरून विरोधकांची माघार
आशीष शेलार ः मालवणात रॅलीदरम्यान टीका
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ : भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आज शहरात भाजपतर्फे शक्तिप्रदर्शन करत प्रचार रॅली काढली. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘विरोधकांनी निवडणुकीतून माघार घेतली असून, खोत यांना आणि भाजपला घाबरून त्यांनी सोडपत्र दिले आहे. मालवण आणि मालवणी माणसाला कोणीही बदनाम करण्याचे काम केले, तर भारतीय जनता पक्ष ते सहन करणार नाही. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरील खोटे आरोप भाजप सहन करणार नाही, असा इशारा यावेळी मंत्री शेलार यांनी दिला.
यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, विजय केनवडेकर, राजू परुळेकर, विकी तोरसकर यांच्यासह सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. शेलार म्हणाले, ‘आम्हाला सेवा कोण देईल? रोज कोण भेटेल? विकासाची कामे कोण करेल? रस्ते, पाणी, गटार, सुशोभीकरण, दिवाबत्ती या सगळ्यात आमच्याबरोबर कोण राहील?’ या मुद्द्यांवर निवडणूक लढणे अपेक्षित आहे आणि भाजपची तीच भूमिका आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत या उच्च विद्याविभूषित, चळवळीमधील, सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रणी म्हणून काम पाहणाऱ्या, नम्र आणि प्रामाणिक उमेदवार आहेत. सेवक म्हणून आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत.’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश देत शेलार यांनी सांगितले की, ‘भाजप कार्यकर्त्यांनो, घरोघरी प्रचार करताना विनम्रपणे सांगा की, मालवणच्या जनतेच्या पाठीमागे मोठा भाऊ देवा भाऊ खंबीरपणे उभा आहे. मालवण शहराला सांस्कृतिक ओळख देणाऱ्या मामा वरेरकर नाट्यगृहाचे काम करण्याची धमक भाजपकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांचा, ज्यात सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गचा समावेश आहे, जागतिक वारसा स्थळात समावेश करण्याचे सौभाग्य भाजपला मिळाले.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.