लाडघर किनारी रविवारी
सायकल, बैलगाडी स्पर्धा
गावतळे, ता. १ ः दापोली तालुक्यातील दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघर येथे दरवर्षी होणाऱ्या समुद्राच्या वाळूमधील सायकलसह धावण्याची स्पर्धा रविवारी (ता. ७) दुपारी ४ वाजता लाडघर समुद्रकिनारा येथे होतील. संध्याकाळी ५ वाजता बैलगाडी स्पर्धा होणार आहे. लाडघर दत्तमंदिर येथे साजऱ्या होणाऱ्या दत्तजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. दत्त सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष दीपक बोरकर, उपाध्यक्ष नीलेश मोरे आणि सचिव राजन सनकुळकर यांनी याबाबत माहिती दिली.
१९६५ पासून या मंडळातर्फे सायकल आणि धावण्याच्या शर्यती आयोजित केल्या जात आहेत. यातील सायकल शर्यतीचे अंतर दोन किलोमीटर आहे; परंतु लाडघर समुद्रकिनाऱ्यावर वाळूमध्ये वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सायकल चालवणे किंवा धावणे हे आव्हानात्मक असते. सुक्या वाळूमध्ये सायकल रूतते किंवा जास्त वेगाने पळतदेखील नाही. त्यामुळे अटीतटीची होणारी ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि त्यामध्ये भाग घेण्यासाठी भरपूर गर्दी जमते. सायकल स्पर्धा खुल्या गटात होतील, यासाठी गिअर, नॉनगिअर अशी कोणतीही सायकल वापरू शकता. धावण्याच्या स्पर्धा मुले आणि मुली खुला गटात होतील. यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नसून, आगाऊ नावनोंदणी करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात येईल. अधिक माहितीसाठी अभिनय कर्देकर, वृषाल सुर्वे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करूया, मैदानी खेळ खेळूया, पर्यावरण जपूया आणि आपले आरोग्य तंदुरुस्त बनवूया, असे आवाहन दत्त सांस्कृतिक मंडळाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.