rat1p24.jpg-
07823
शेनाळे : संभुराजू घराणे ब्रीदपूजन सोहळ्यात नवीन शिष्यत्व सादर करताना गुरुवर्य, वस्ताद, शाहीर मंडळी.
--------
संभुराजू घराण्याच्या ब्रीदपूजनाला शाहिरी सूर
गोविंदबुवा लाड व नामदेवबुवा दळवी पुण्यतिथी; नवोदित कलाकारांनी स्वीकारले शिष्यत्व
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १ : कलगीतुरा लोककलेतील प्रख्यात संभुराजू तुरेवाले घराण्यातर्फे आयोजित वार्षिक ब्रीदपूजन व गुरुवर्य गोविंदबुवा लाड आणि नामदेवबुवा दळवी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम शेनाळे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पारंपरिक शाहिरी गाण्यांच्या गजरात हा सांस्कृतिक सोहळा उत्साहात झाला.
सकाळी घराण्याचे ब्रीद मांडून ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य काशिराम बिरवाडकर, गुरुवर्य गोविंदबुवा लाड आणि नामदेवबुवा दळवी यांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच गोविंदबुवा आणि नामदेवबुवा यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचे संतोष व सोनम वाडकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शाहिरी कलाक्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्या कलाकारांसाठी ब्रीदपूजनाचा सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
नारगोली गावातील नवोदित कलाकारांनी ब्रिदासमोर कलगीवाले मनोहर पारदुले व सुरेश तोडणकर या गुरूंचे पूजन करून हार अर्पण करत त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. ब्रीदपूजनानंतर शाहीर नरेश कदम, दिनेश जांभळे, एकनाथ कानसरे तसेच नवनिर्वाचित नारगोली तमाशा मंडळाने दमदार शाहिरी गाणी सादर केली. कार्यक्रमाला ओम शिवशंभो उन्नती कलापथकाचे अध्यक्ष सुनील साळवी, कवीवर्य दिनकर दळवी, प्रल्हाद शिरशिवकर, अनंत जाधव, सदानंद वाडकर, रामचंद्र म्हात्रे, शिवराम पोटले, अजित लाड, नथुराम पाष्टे, महादेव माळी, शीतल विचारे, प्रकाश रक्ते आदी उपस्थित होते.
चौकट
शाहीर अनिल शिंदे यांना आदरांजली
परिसरातील कुडूक खुर्द हनुमानवाडीचे गुरू गणपती घराण्यातील ज्येष्ठ शाहीर वस्ताद अनिल शिंदे यांचे रात्री निधन झाले. नियोजित कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी संभुराजू घराण्याच्यावतीने शाहीर अनिल शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.