कोकण

राजापुरात महाविकास आघाडीची प्रचार फेरी

CD

-rat१p२६.jpg-
२५O०७८३३
राजापूर ः प्रचारफेरीमध्ये सहभागी झालेले महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार.
-----
राजापुरात आघाडीची प्रचार फेरी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः राजापूर पालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २) मतदान होणार आहे. त्यापूर्वी आज महाविकास आघाडीतर्फे राजापूर जवाहरचौक ते बाजारपेठ ते पुन्हा राजापूर जवाहर चौक अशी प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार हुस्नबानू खलिफे आणि सर्व नगरसेवकपदाचे उमेदवार सहभागी झाले होते.
महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्षपदासाठी खलिफे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी होत असलेल्या लढतींसाठी महाविकास आघाडीतर्फे उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. आज महाविकास आघाडीतर्फे शहरामध्ये प्रचारफेरी काढण्यात आली. जवाहरचौक-बाजारपेठ-जवाहरचौक अशा काढण्यात आलेल्या फेरीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमवेत शिवसेनेचे माजी आमदार गणपतराव कदम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर, शहराध्यक्ष आजीम जैतापकर, शिवसेनेचे (उबाठा) जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र डोळस, तालुकाप्रमुख कमलाकर कदम आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT