चिपळूणला आज वाहतूक व्यवस्थेत बदल
नगरपालिका मतमोजणी प्रक्रिया : बहादूरशेखनाका - चिंचनाका मार्ग बंद
चिपळूण, ता. १ : चिपळूण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रिया ३ डिसेंबरला शहरातील युनायटेड हायस्कूलमधील सभागृहात होणार आहे. मतमोजणीवेळी चिपळूण-कऱ्हाड मार्गावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने शहरातील बहादूरशेखनाका ते चिंचनाका हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत.
निवडणुकीची मतमोजणी बुधवारी (ता. ३) सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे चिपळूण-कऱ्हाड मार्गावरील बहादूरशेखनाका ते चिंचनाकादरम्यान विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी अपेक्षित आहे. शहरातील मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तात्पुरती वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना ३ डिसेंबरला सकाळी ७ वाजल्यापासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत हा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.
मतमोजणीवेळी पर्यायी मार्ग म्हणून चिंचनाका, पॉवर हाऊस ते बहादूरशेख नाका असा वापर करावा, अशा सूचनाही केल्या आहेत. पोलिसांची वाहने, अग्निशमन बंब, रुग्णवाहिका, शासकीय वाहने तसेच मान्यवरांच्या दौऱ्यासाठी पोलिसांनी परवानगी दिलेली वाहने या निर्बंधातून वगळली आहेत. अत्यावश्यक परिस्थितीत तैनात अधिकाऱ्यांना तत्काळ निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.