rat1p27.jpg-
07844
रत्नागिरी ः मारुती मंदिर येथील गाळ्यावर उगवलेल्या गवताला लागलेली आग.
-----------
मारुती मंदिरजवळ गाळ्याला आग
सलग तिसरी घटना; अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : शहरात सलग तिसऱ्या दिवशीही आगीची घटना घडली. मारुती मंदिर शिवाजी क्रीडांगण परिसरातील गाळ्याच्या ठिकाणी मोठी आग लागली. यात स्फोट झाल्यामुळे अनेकांची धावपळ झाली. छतांवर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली; परंतु पालिकेच्या अग्निशमन दलाने तत्परता दाखवत ही आग आटोक्यात आणली.
छत्रपती शिवाजी क्रीडांगणाजवळ हे दुकानगाळे आहेत. त्यापैकी एका गाळ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीचे लोट आणि धुरामुळे परिसरात गडबड उडाली. परिसरातील रहिवाशांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धाव घेतली. मिळेल त्या साधनांनी, प्रामुख्याने पाण्याचा वापर करून आग नियंत्रणात आणण्याचा त्यांनी शर्थीचा प्रयत्न केला. आग मोठी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले. निवडणुकीमुळे पालिकेचा संपूर्ण परिसर बॅरिकेडस्ने बंदिस्त करण्यात आला; परंतु आग लागल्यामुळे बॅरिकेड बाजूला करून बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला आणि जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
रत्नागिरी शहरात सलग तिसऱ्या दिवशी आगीची घटना घडल्यामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे. अशा सततच्या घटनांमुळे नागरिकांच्या मालमत्तेची आणि सुरक्षिततेची समस्या निर्माण झाली आहे. या सततच्या आगीच्या घटनांमागील नेमकी कारणे शोधून त्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.