कोकण

''वाघजाई'' चिपळूण-रत्नागिरी संघ विजेता

CD

07848
पाट : महिला गटातील विजेता डॉ. शिरोडकर हायस्कूल परेल-मुंबई संघ.
07849
पाट : पुरुष गटातील विजेत्या वाघजाई क्रीडा मंडळ चिपळूण-रत्नागिरी संघासह मान्यवर.

‘वाघजाई’ चिपळूण-रत्नागिरी संघ विजेता

पाट येथील कबड्डी स्पर्धा; महिलांमध्ये डॉ. शिरोडकर हायस्कूल, मुंबईची बाजी

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १ ः पाट येथे आज झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात वाघजाई क्रीडा मंडळ चिपळूण-रत्नागिरी, तर महिलांमध्ये डॉ. शिरोडकर हायस्कूल परेल-मुंबई संघ विजेता ठरला. या स्पर्धेतील उपांत्य व महाअंतिम सामने अतिशय रोमांचक व उत्कंठावर्धक, जल्लोषपूर्ण वातावरणात झाले.
एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाट संचलित एस. एल. देसाई विद्यालय, (कै.) एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा (कै.) डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालय व (कै.) राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सर्व संस्था पदाधिकारी व माजी विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. महिला गटातील पहिला उपांत्य सामना अनिकेत स्पोर्टस्‌ क्लब खेड रत्नागिरी विरुद्ध प्रकाश तात्या बालवडकर पुणे यांच्यामध्ये झाला. यात पुणे संघ विजयी झाला. दुसरा उपांत्य सामना जय गणेश मालवण विरुद्ध शिरोडकर हायस्कूल परेल-मुंबई यांच्यामध्ये झाला. यामध्ये परेल-मुंबई संघाने विजय प्राप्त केला. पुरुष गटातील पहिला उपांत्य सामना वाघजाई क्रीडा मंडळ चिपळूण-रत्नागिरी विरुद्ध उत्कर्ष क्रीडा मंडळ भांडुप-मुंबई उपनगर यांच्यामध्ये झाला. या सामन्यात रत्नागिरी संघ विजयी झाला. दुसरा उपांत्य सामना न्यू सम्राट सुसगाव पुणे विरुद्ध स्वस्तिक क्रीडा मंडळ-मुंबई उपनगर यांच्यात झाला. त्यामध्ये पुणे हा संघ विजयी झाला.
महिला गटात अनिकेत स्पोर्ट्स क्लब खेड रत्नागिरी विरुद्ध शिरोडकर हायस्कूल परेल मुंबई उपनगर या दोन संघांमध्ये झालेल्या महाअंतिम सामन्यात परेल मुंबई या संघाने विजेतेपद पटकावले. पुरुष गटात वाघजाई क्रीडा मंडळ चिपळूण रत्नागिरी विरुद्ध न्यू सम्राट सुसगाव पुणे या दोन संघांमध्ये झालेल्या महाअंतिम सामन्यात चिपळूण संघ विजेता ठरला.पुरुष गटातील तिसऱ्या क्रमांक उत्कर्षनगर भांडुप मुंबई उपनगर, चौथा क्रमांक स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर यांनी मिळविला. महिलांमध्ये तिसऱ्या क्रमांक बक्षीस जय गणेश मालवण-सिंधुदुर्ग, चौथा क्रमांक बक्षीस तात्या बालवडकर पुणे यांनी पटकावला.
महाअंतिम सामन्याला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कबड्डी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष व मालवणी कवी रोजारिओ पिंटो, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक अनिल रणदिवे, उद्योगपती मनोज नाईक, सारस्वत बँकेचे व्यवस्थापक सुनील सौदागर, प्रमोद ठाकूर, कोकण रेल्वे कर्मचारी गणपत तेली उपस्थित होते.
पुरुष गटातील विजेत्यांना प्रथम ५५ हजार, द्वितीय ४५ हजार, तृतीय २५ हजार, चतुर्थ १५ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट पक्कड-विशाल जाधव (प्रो-कबड्डी लीग), उत्कृष्ट चढाई-शुभम शिंदे (प्रो- कबड्डी लीग), उत्कृष्ट खेळाडू-अजिंक्य पवार (तिन्ही प्रो-कबड्डी लीग) यांचा गौरव केला. महिला गटातील विजेत्यांना अनुक्रमे ३५ हजार, २५ हजार, १५ हजार, १० हजार रुपये अशी पारितोषिके दिली. उत्कृष्ट पक्कडपटू-वैष्णवी जाधव, उत्कृष्ट चढाईपटू-साक्षी सावंत (दोन्ही परेल-मुंबई), उत्कृष्ट खेळाडू-सिद्धी चाळके (खेड रत्नागिरी) यांना गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT