कोकण

मालवणात कडक पोलिस बंदोबस्त

CD

मालवणात कडक पोलिस बंदोबस्त

यंत्रणा सज्ज ः मतदान केंद्रांवर दोन सीसीटीव्ही कॅमेरे

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ : मालवण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (ता. २) सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक व पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील सर्व २० मतदान केंद्रांवर प्रत्येकी दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मतदान केंद्राच्या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
शहरात आठ अधिकारी आणि चार गस्ती केंद्र नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक १०० मीटरवर एक पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. यासाठी ८० पोलिस कर्मचारी, ५० होमगार्ड, सहा वाहने, एसआरपी गट १६ च्या दोन प्लाटून मालवण शहरात तैनात ठेवण्यात आले आहेत, तर ३० कर्मचारी राखीव गटात ठेवण्यात आले आहेत. मालवण शहरात शांततेत आणि उत्साहात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पोलिस बंदोबस्त सज्ज करण्यात आला आहे.
मतमोजणी नगरपालिका सभागृहात दोन तासांत पूर्ण करण्याच्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दोन राउंडमध्ये शहरातील पाच प्रभागांचे चित्र स्पष्ट होणार आहे. उर्वरित दोन राउंडमध्ये शहरातील सर्व मतमोजणी पूर्ण होणार आहे. मतमोजणीवेळी शिंदे शिवसेनेसाठी त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाकरे शिवसेनेसाठी बांगीवाडा परिसरातील युनियन बँक परिसरात तर भाजपसाठी फोवकांडा पिंपळ परिसरात थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पालिका मुख्याधिकारी प्रतीक थोरात काम पाहत आहेत. शहरातील पोलिस बंदोबस्त पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Vidhan Bhavan Bomb Threat: विधानभवनात बॉम्बची धमकी! ई-मेलनंतर मुंबईत खळबळ; पोलिस-बॉम्ब स्क्वॉडची धावपळ, मोठी शोधमोहीम सुरू

Latest Marathi News Live Update : पुढील दोन दिवस उन्हाचा कडका, विदर्भासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तापमान 40 पार जाण्याची शक्यता!

LPG Cylinder Price Hike : गॅस संकट गडद, जाणून घ्या तुमच्या शहरात आज किती आहे LPG सिलिंडरचा दर ?

शुभमंगल सावधान! इशा डेचं धुमधडाक्यात लग्न, सोशल मीडियावर फोटो VIRAL

LPG Gas Crisis: पंधरा दिवस युद्ध चालल्यास गॅस संकट गडद; इंधन दरवाढीसह आयातीवर परिणाम साठेबाजी रोखण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT