swt24.jpg
07940
कुडाळः सिंधू केअर हॉस्पिटल, पॅथो केअर सेंटरच्या वतीने प्रमोद भोगटे यांचा सत्कार करताना डॉ. मकरंद परुळेकर. बाजूला रोटरी व लायन्स क्लबचे पदाधिकारी. (छायाचित्र ः अजय सावंत)
धकाधकीच्या जीवनात व्यायाम महत्त्वाचा
प्रमोद भोगटे ः कुडाळात ‘सिंधू केअर’, ‘पॅथो केअर’तर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ः आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने व्यायाम करणे काळाची गरज बनली आहे. किमान एक तास तरी व्यायाम करावा, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले ‘आयर्न मॅन’ प्रमोद भोगटे यांनी सत्कारप्रसंगी केले. सिंधू केअर हॉस्पिटल आणि पॅथो केअर सेंटरच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
गोव्यात झालेल्या ‘गोवा आयर्नमॅन ७०.३’ ही दमश्वासाची परीक्षा घेणारी स्पर्धा दिलेल्या वेळेत पूर्ण करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळच्या प्रमोद भोगटे यांनी ४५ ते ४९ या वयोगटांत उल्लेखनीय यश मिळविले. देशविदेशातून सुमारे पंधराशे स्पर्धक सहभागी झालेल्या या स्पर्धेत १.९ कि.मी. स्विमिंग, ९० कि.मी. सायकलिंग आणि २१ कि.मी. रनिंग अशी सुमारे ११३ किलोमीटरची स्पर्धा भोगटे यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण केली. साडेआठ तासांत हे अंतर पूर्ण करायचे असताना भोगटे यांना हे अंतर पूर्ण करण्यासाठी ८ तास २५ मिनिटे लागली. अशाप्रकारची स्पर्धा पूर्ण करणारे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पहिले स्पर्धक ठरले आहेत. त्यांचा सत्कार सिंधू केअर हॉस्पिटलचे डॉ. मकरंद परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी क्रीडाईचे गजानन कांदळगावकर, एमआयडीसी असोसिएशन, कुडाळचे कार्यवाह नकुल पार्सेकर, सिंधू केअर हॉस्पिटल व पॅथो केअर सेंटरचे पॅथॉलॉजी प्रमुख डॉ. संजय सावंत, रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष राजीव पवार, लायन्स क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष आनंद कर्पे, लायन्स सचिव सीए सागर तेली, शशिकांत चव्हाण, सचिन मदने, डॉ. गौरी परुळेकर, राजेंद्र केसरकर, संजय पिंगुळकर, राजन बोभाटे, प्रणय तेली, रुपेश तेली, डॉ. आनंद मुनघाटे, रुपेश तेली, अभिषेक माने, राजन मोर्ये आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
श्री. भोगटे म्हणाले, ‘‘माझ्या यशात तुम्हा सर्वांचे योगदान आहे. टीमवर्क फार महत्त्वाचे आहे. त्यातूनच अनुभव घेत ही स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला. गेले दहा महिने अखंड सराव सुरू होता.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.