कोकण

बांद्यात दत्त जयंतीनिमित्त उद्यापासून विविध कार्यक्रम

CD

swt25.jpg
O07941
श्री गुरुदेव दत्त

बांद्यात दत्त जयंतीनिमित्त
उद्यापासून विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २ः श्री दत्त मंदिर, लकरकोट बांदा येथे यावर्षी ४ व ५ डिसेंबला दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. या दोन दिवसांच्या उत्सवात महापूजा, अभिषेक, सामूहिक गाऱ्हाणे, भजन-संध्या, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भक्तांनी उत्सवात उपस्थित राहून दर्शन व तीर्थ-प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गुरुवारी (ता. ४) पहाटे ५ वाजता काकड आरती व षोड्शोपचार पूजा, सकाळी ८ वाजता महाराजांची महापूजा व सार्वजनिक अभिषेक, ९ वाजता सत्यनारायण पूजा, दुपारी १ वाजता महानैवेद्य, महाआरती व सामूहिक गाऱ्हाणे, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता श्री दत्तजन्म व कीर्तन, सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत भजनांचे कार्यक्रम, रात्री ९.३० वाजता शेजाआरती, १० वाजता दोन अंकी धमाल मालवणी विनोदी नाटक ''वर्सल-एक रहस्यमय प्रेमकहाणी'' आदी कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी (ता. ५) सकाळी ९ वाजता श्री दत्त महाराजांची नित्यपूजा, दुपारी १ वाजता महानैवेद्य, महाआरती व सामूहिक सांगता गाऱ्हाणे, १.३० वाजता महाप्रसाद (समराधना) आदी कार्यक्रम होणार आहेत. उत्सवाचे आयोजन दत्तप्रसाद कला, क्रीडा मंडळ, लकरकोट बांदा यांनी केले असून, सर्व भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुशांत पांगम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT