कुडाळात जानेवारीत
‘ग्रंथपाल’ परीक्षा वर्ग
कुडाळ ः येथील रावबहादूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय) येथे ग्रंथपाल प्रमाणपत्र परीक्षा मार्गदर्शन वर्ग १ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या वर्गाचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शनिवार व रविवार असे आठवड्यातून दोन दिवस सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही परीक्षा ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र यांच्यातर्फे जूनमध्ये घेण्यात येणार आहे. वर्गात प्रवेश घेण्यासाठी वयाची अट नसून बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थी क्षमता ५० इतकीच असल्याने इच्छुक उमेदवारांनी प्रवेशासाठी जिल्हा ग्रंथालयाशी संपर्क साधावा. प्रवेशाची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. सार्वजनिक ग्रंथालयात काम करणाऱ्या सेवकांना प्राधान्य राहील. अधिक माहितीसाठी ग्रंथपाल राजन पांचाळ यांच्याशी संपर्क करावा.
..................
सांगवे तपोवनात
रविवारी पुण्यतिथी
कणकवली ः सांगवे-कुंभारवाडी येथील श्री गणेश दत्त मंदिर, सांगवे तपोवन येथे श्री सद्गुरू परमहंस गणुबाबा सांगवेकर महाराज यांची १८ वी पुण्यतिथी रविवारी (ता. ७) होणार आहे. या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी पावणेसहाला काकड आरती, सातला नित्य पूजा-अर्चा, दहाला होम-हवन, तीर्थ प्रसाद, एकराला प. पू. गणूबाबा महाराज यांची पाद्यपूजा (गुरुपूजन), दुपारी एकला महाप्रसाद, सायंकाळी चारला प्रवचन, ७ ते ८.३० पर्यंत पालखी मिरवणूक, रात्री दहाला हृदयनाथ गावडे (साळगाव) यांचे कीर्तन आयोजित केले आहे. या कार्यक्रमांना भाविक भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वस्त, श्री परमहंस सांप्रदाय श्री गणेश दत्त मंदिर, सांगवे तपोवन, कुंभारवाडी यांच्यावतीने केले आहे.
-----
दाभिलचा आज
वार्षिक जत्रोत्सव
ओटवणे ः दाभिल ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. ३) होणार आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणींची पाठीराखी अशी माऊलीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर माऊलीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर खानोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मानकरी तसेच दाभिल ग्रामस्थांनी केले आहे.
---
कसाल-राणेवाडीत
उद्या दत्त जयंती
कुडाळ ः कसाल-राणेवाडी येथील सिद्धगोसावी महापुरुष मठ येथे उद्या (ता. ४) श्री दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी सकाळी सातपासून श्रींची पूजा व अभिषेक, श्रींची आरती व महाप्रसाद, सायंकाळी सातला कसाल येथील वारकरी संप्रदाय, माऊली महाराज बबन सावंत यांचा हरिपाठ, रात्री नऊला किर्लोस-गावठाणवाडी येथील बुवा दशरथ घाडीगावकर यांचे गांगेश्वर प्रासादिक दिंडी भजन व रात्री १० वाजल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांची भजने होणार आहेत. उपस्थित राहावे, असे आवाहन श्री दत्त जयंती उत्सव मंडळ, राणेवाडी यांनी केले आहे.
.......................
सावंतवाडी आगारात
उद्या दत्त जन्मोत्सव
सावंतवाडी ः येथील एसटी आगार आवारातील दत्त मंदिरात गुरुवारी (ता. ४) दत्त जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. सायंकाळी साडेसातला वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा ‘देवी हनुमंतेश्वरी’ हा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. दत्त जयंतीनिमित्त सकाळी सातपासून श्रींची पूजा, धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी साडेपाचला कीर्तनकार कांदे बुवा यांचे कीर्तन, सातला दत्तजन्म उत्सव, साडेसातला दशावतार नाट्यप्रयोग होईल. शुक्रवारी (ता. ५) सकाळपासून लघुरुद्र व धार्मिक कार्यक्रम, महाआरती, दुपारी ११.३० ते दुपारी ३ या वेळेत महाप्रसाद होणार आहे.
.........................
रोणापालला उद्या
माऊली जत्रोत्सव
मडुरा ः रोणापाल येथील श्री देवी माऊली पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी (ता. ४) होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी दहाला देवीची पूजा, अभिषेक आदी धार्मिक विधी करून नंतर गाऱ्हाणे घालण्यात येईल. त्यानंतर ओट्या भरणे, दर्शन, नवस करणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम सुरू राहतील. रात्री पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर दशावतार नाट्यप्रयोग होईल. लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.