कोकण

दापोलीत थंडीचा कडाका

CD

दापोलचे किमान तापमान
९.१ अंश सेल्सिअसवर
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २ः दापोलीत थंडीचा कडाका वाढला असून, दुपारीही थंडी जाणवत आहे. दापोलीचे कमाल तापमान ३१.१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ९.१ अंश सेल्सिअसवर आले आहे.
गतवर्षी ३० नोव्हेंबरला किमान तापमान ८.८ अंश आणि कमाल ३१.७ अंशइतके होते. यावर्षीचे तापमानही जवळपास तितकेच नोंदवले गेले. रात्री आणि पहाटे गारवा जाणवत असून, स्थानिक नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
हवेत गारवा वाढल्याने शेतकऱ्यांनीही आपल्या पिकांवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तापमानातील चढ-उतारामुळे फळबागा आणि भाजीपाल्याच्या लागवडीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. दापोली हा सागरी किनारपट्टीचा प्रदेश असूनही येथे डिसेंबर- जानेवारीमध्ये किमान तापमान १०च्या खाली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात दापोली परिसरात सकाळी धुके आणि गारठ्याचा अनुभव वारंवार येतो. पर्यटकांसाठी हा काळ अधिक आकर्षक मानला जातो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असून, नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संजय राऊतांना कर्करोगाचं निदान, ऐन दिवाळीत किमोथेरपी; म्हणाले, पहिल्यांदा समजलं तेव्हा हसू आलं

Gold Price Falls : आठवड्याचा शेवट गोड! सोन्याचे भाव दहा हजारांनी घटले, चांदीची ३ लाख ५० हजारांकडे वाटचाल

Odisha Buddhist Sites: ओडिशातील बौद्ध स्थळे ‘युनेस्को’च्या यादीत; सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचा समावेश!

भारताचे ७१ ‘वाँटेड आरोपी’ फरार; परदेशात जगत आहेत विलासी जीवन, मोदी सरकारने जाहीर केला अहवाल...

National Voters Day 2026: दरवर्षी 25 जानेवारीलाच का साजरा केला जातो 'राष्ट्रीय मतदार दिन'? जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT