कोकण

हातिवले येथे उद्या दत्तजयंती

CD

हातिवले येथे
उद्या दत्तजयंती
राजापूरः तालुक्यातील हातिवले येथील आदिनाथ सांप्रदायिक अध्यात्म भक्तीज्ञान प्रसारक ओम सिद्ध सेवा समाज ज्ञानमंदिर येथे गुरूवारी (ता. ४) दत्तजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. सकाळी साडे सात वाजता अभिषेक, पूजा, महाआरती, साडे नऊ वाजता प्रवचन व श्री दत्तजन्म आख्यान, दुपारी साडे बारा वाजता दत्तजन्म सोहळा, एक वाजता दर्शन, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायं. साडे सहा वाजता पालखी उत्सव, रात्री नऊ वाजता श्री अष्टविनायक नाट्य नमन मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.
-----------
दत्तजयंतीनिमित्त
शीळमध्ये कार्यक्रम
राजापूरः शहरानजीकच्या शीळ येथील श्री दत्तगुरू सेवा मंडळ वरची बाईतवाडीतर्फे गुरूवारी (ता. ४) दत्तजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. त्या निमित्ताने सकाळी दहा वाजता दत्त जन्मसोहळा, षोड्शोपचार पूजा व आरती, अकरा वाजता होमहवन, श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी एक वाजता हळदीकुंकू समारंभ, तीन वाजता महाप्रसाद, सात वाजता श्री दत्तगुरू सेवा मंडळ शीळ वरची बाईतवाडी मंडळाचे भजन, हरिपाठ, रात्री नऊ वाजता श्री नवलादेवी नमन मंडळ वनगुळे (ता. लांजा) यांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------
गोठणेदोनिवडेतील
मंदिरात दत्तजयंती
राजापूर ः तालुक्यातील गोठणेदोनिवडे हातणकरवाडी येथील श्री दत्तदेव सेवा मंडळ यांच्यावतीने दत्तजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. गुरूवारी (ता. ४) मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी सात वाजता श्री दत्तदेव पूजा, नऊ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, अकरा वाजता होमहवन विधी, दुपारी बारा वाजता श्री दत्तदेव तीर्थप्रसाद व महाप्रसाद, तीन वाजता हळदीकुंकू समारंभ, चार वाजता मुलामुलींचे स्पर्धात्मक कार्यक्रम, सहा वाजता श्री दत्तदेव महाआरती, सात वाजता ढोलपथक, रात्री नऊ वाजता मनोरंजन, सत्कार आणि बक्षीस समारंभ, अकरा वाजता श्री सिद्धिविनायक नमन मंडळ भू (मधलीवाडी) यांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuvir Khedkar: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर रघुवीर खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; ''मागच्या ५३ वर्षांमध्ये केलेला संघर्ष...''

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर; पैसे कधी हातात पडणार?

Nat Sciver Brunt: तीन हंगामांची प्रतीक्षा संपली! WPL मध्ये पहिलं शतक ठोकलं; नॅट सायव्हर ब्रंटनं रचला इतिहास

Bigg Boss 6: बिग बॉसच्या घरात 'मिस्टर इंडिया'ची झाली वाईल्ड कार्ड एन्ट्री! आता कोण जाणार घराबाहेर?

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी वेस्ट इंडिजचा १५ सदस्यीय संघ जाहीर! अष्टपैलू खेळाडूंवर भर, पाहा संपूर्ण टीम

SCROLL FOR NEXT