भरणे महामार्गावरील भित्तिचित्रे काळवंडली
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २ : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले. कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून आधुनिक रस्ते बांधले गेले; पण या विकासाच्या गोंगाटात भरणे येथे महामार्गाच्या अंडरपासजवळील संरक्षक भिंतींवर उभारलेली छत्रपती शिवराय आणि मावळ्यांचा शौर्य सांगणारी भव्य चित्रे आज पांढऱ्या-करड्या धुरकट थरामुळे झाकोळली गेली आहेत. काही ठिकाणी तर या भित्तिचित्रांवर जाहिरातींचे पोस्टर लावून विद्रूप करणारा निर्लज्जपणाही करण्यात आला आहे.
लोटे घाणेखुंट परिसरात कोकणचे सुंदर दर्शन घडवणारी निसर्गचित्रे काढण्यात आली; पण रस्त्याकडेला कचरा जाळण्याची प्रवृत्ती आणि प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे ही चित्रेही आगीच्या ज्वालांनी काळवंडली गेली आहेत.
भरणेनाका परिसराला छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यामुळे एक वेगळे वलय आहे. या ठिकाणी चित्रे रेखाटण्यात आल्यानंतर शेकडो लोकांनी रील बनवून लोकप्रिय केले, तोच परिसर आता दयनीय अवस्थेत आहे; पण आश्चर्य म्हणजे एकाही शिवप्रेमी संघटनेने आवाज उठवलेला दिसत नाही. महामार्ग विभागाकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे ही भित्तिचित्रे दयनीय अवस्थेत दिसून येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.