कोकण

निवडणुकीत पैसे वाटप लोकशाहीला मारक

CD

08044
सावंतवाडी ः माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी पत्नी पल्लवी केसरकर यांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावला.

निवडणुकीत पैसे वाटप लोकशाहीला मारक

दीपक केसरकर ः शिंदे शिवसेनेसाठी पोषक वातावरण

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः सावंतवाडीमध्ये मतदानासाठी उत्स्फूर्तपणे मतदारांनी बजावलेला हक्क पाहता शिंदे शिवसेनेच्या बाजूने चांगला निकाल येईल; मात्र निवडणुकीच्या दिवशी सुद्धा पैसे वाटपाचे प्रकार होत असल्यास ते अत्यंत चुकीचे आणि लोकशाहीला मारक असल्याचे मत माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. महायुती एकत्र राहावी व पुढच्या निवडणुका तशा व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. दुरावा कमी व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही ते म्हणाले. श्री. केसरकर यांनी शहरातील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते बोलत होते.
केसरकर म्हणाले, ‘पैशांचा राजरोसपणे होणारा वापर चुकीचा आहे. लोकशाहीला मारक अशी ही घटना आहे. निवडणुकीच्या दिवशी ते होत असल्यास योग्य नाही. बाहेरून येणाऱ्यांना प्रतिबंध करण्याचे काम पोलिस यंत्रणेने करायला पाहिजे. तसे झाले असते तर हे घडले नसते. पैशाचे असे वाटप यापूर्वी कधीही झाले नव्हते. हा प्रकार निंदनीय आहे. पैशांचे वाटप करुन निवडणूका जिंकायच्या असतील तर त्यात अर्थ राहणार नाही. पैसे वाटपाचा थोडा-फार परिणाम होतो; मात्र सावंतवाडीत तो परिणाम होईल असे वाटत नाही. त्यामुळे निकाल चांगला येईल, असा विश्वास आहे‌. सिंधुदुर्गनंतर सोलापूर दौऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रवास करताना स्वतःचे कपडे सोबत घ्यावे लागतात; मात्र त्यातून पैसे आणले, अशी होणारी टीका निंदनीय आहे.’ यावेळी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, दीपाली सावंत, आबा केसरकर आदी उपस्थित होते.
..................
दोन्हीही पक्षांकडून पैशांचे वाटप ः राऊळ
सत्ताधाऱ्यांच्या धनशक्तीच्या अमिषाला जनता बळी पडणार नाही. दोन्ही पक्ष धुतल्या तांदळाचे नाहीत. दोघांनीही पैशांचे वाटप केले. पैशाचा कितीही पाऊस पडला, तरी शिवसेनेचा विजय निश्चित आहे, असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला. शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावरील बूथवर जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी मदन राणे, संदेश राणे, ऑल्विन लोबो, सिद्धेश कासार, संजय गवस, संजय सुतार, रमेश गावकर, राजू शेटकर, विनोद काजरेकर, विनोद ठाकूर, प्रशांत बुगडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Property: हे कोणालाही अपेक्षित नव्हतं! मुंबईत एवढ्या वेगाने घरे का विकत घेत आहेत? प्रॉपर्टी मार्केटने मोडले सर्व रेकॉर्ड

Latest Marathi News Live Update : पुण्यातील नव्याने झालेला सिंहगड रोड वरचा उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडण्यात येणार

MLA Amol Khatal: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा महाविजय निश्चित : आमदार अमोल खताळ; विकासाची गती तीन पटीने वाढली

Balasaheb Thorat : ईव्हीएमबाबत ते काहीही करू शकतात: बाळासाहेब थोरात; आयोगाचे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम !

स्मृती मंधाना अन् पालाश मुच्छलचा विवाह ७ डिसेंबरला होणार? कुटुंबातील सदस्याने दिली महत्त्वाची अपडेट...

SCROLL FOR NEXT