swt235.jpg
08098
श्री भगवती माऊली
चिंदर भगवती माऊलीची
उद्यापासून ‘दिंडे जत्रा’
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २ः चिंदर येथील भगवती माऊलीचा यात्रोत्सव दिंडे जत्रा ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समितीतर्फे केला आहे.
गुरुवारी (ता. ४) सकाळी भगवती माऊलीची विधीवत महापूजा, बारापाच मानकरी यांच्या वतीने भगवती माऊलीला साकडे, सकाळी ९ वाजता यात्रेकरू भाविकांचे स्वागत व भगवती माऊलीच्या दर्शनाला सुरुवात, ११ वाजल्यापासून भगवती माऊलीस मानकऱ्यांचा महाप्रसाद अर्पण, देवीची ओटी भरणे, नवस, साकडे आदी कार्यक्रम, रात्री ११ नंतर ढोलताशांच्या गजरात रामेश्वर मंदिराकडून ग्रामदेवतांच्या तरंगांचे भगवती मंदिरांत आगमन होणार आहे. पहाटे ३ वाजता पुराण गोंधळ व दिंडे जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीच्या दिवट्यांचे नृत्य होणार आहे.
शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी ५.३० वाजता श्री देव रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ देऊळवाडी, ६.३० वाजता श्री देव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ साटमवाडी, ७.३० वाजता गावडे पुरुष प्रासादिक भजन मंडळ गावडेवाडी यांची भजने, रात्री ९ नंतर पुराण, कीर्तन, श्रींची आरती आदी कार्यक्रम, शनिवारी (ता. ६) सायंकाळी ४ वाजता श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ सडेवाडी, ५.३० वाजता श्री देव गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ पालकरवाडी, ६.३० वाजता श्री देव वाडत्री ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ कोंड अपराजवाडी, ७.३० वाजता श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ कुंभारवाडी यांचे तसेच रविवारी (ता. ७) सायंकाळी ५.३० वाजता श्री देव ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ लब्देवाडी, ६.३० वाजता श्री देव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ तेरईवाडी, ७.३० वाजता श्री देव आकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ गावठणवाडी यांची भजने, रात्री ९ वाजता पुराण गोंधळ, १०.३० वाजता श्री भवानी रामेश्वर डंपर सर्व्हिस मनोज हडकर पुरस्कृत, श्री दत्त माऊली पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग ‘वेसरोत्पत्ती’ सादर होणार आहे. सोमवारी (ता. ८) दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत चालू वहिवाटदार घाडी कुटुंबीय, सायंकाळी ६ वाजता श्री देव पिसाळी ब्राम्हण देव प्रासादिक भजन मंडळ तेरई, ७ वाजता श्री देव भगवती प्रासादिक भजन मंडळ भटवाडी यांची भजने, १० वाजता भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी आयोजित कौटुंबिक, सामाजिक तीन अंकी नाटक ‘सासुरवास’, रात्री २.३० नंतर गोंधळ कीर्तन, लळित, नृत्य आदी कार्यक्रम होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.