कोकण

रत्नागिरीःमोटारीची काच फोडून १० लाख लांबवले

CD

मोटारीची काच फोडून
१० लाख रुपये लांबवले
मिरकरवाडा जेटीवर घटना ः चोरट्याविरुद्ध गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः शहरातील मिरकरवाडा-जेटी येथील रस्त्यावर उभ्या केलेल्या मोटारीची काच फोडून चालक सीटखाली ठेवलेली १० लाख रुपयांची रोकड चोरट्याने पळवली. चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना सोमवारी (ता. १) भरदुपारी ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (ता. १) दुपारी सव्वाबारा ते एकच्या सुमारास मिरकरवाडा-जेटी रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुबिन मोहंमद मुल्ला (वय ५०, रा. गोळप, ता. जि. रत्नागिरी) यांचा मच्छीमार व्यवसाय आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या एकूण चार पर्ससिनेट बोटी आहेत. त्यावर सुमारे १०० ते १२५ खलाशी आहेत. त्या खलाशांचा आठवड्याच्या खर्चासाठी पैसे देण्यासाठी मुबिन मुल्ला यांनी त्यांच्या सुनांच्या नावे असलेल्या एका बॅंकेच्या शिवाजीनगर शाखेतून चेकद्वारे १० लाखांची रक्कम काढून ती निळ्या रंगाच्या पिशवीत ठेवली. ती पिशवी मोटार (एमएच ०८ बीई ५७८६) चालकांच्या सीटजवळील बाजूच्या सीटखाली ठेवली. त्यानंतर ते मोटार घेऊन मिरकरवाडा-जेटी रस्त्यावर आले. तेथील रस्त्यावर मोटार उभी करून फिर्यादी मुबिन मिरकरवाडा जेटी येथे गेले. तासाभरात चोरट्याने त्यांच्या मोटारीची मागील डावी काच हत्याराने फोडून सीटखाली ठेवलेली पिशवीतील १० लाखांची रोख रक्कम पळवली. या प्रकरणी मुबिन मुल्ला यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुण्यात विद्यापीठासमोर नवा उड्डाणपूल… पण कोड्यात पडले चालक... ट्रॅफिकचा नवा पॅटर्न! कुठून जावं, कुठे वळावं?

Latest Marathi News Live Update : एलपीजी (LPG) गॅसच्या तुटवड्याचा हॉटेल व्यवसायावर परिणाम

Pune LPG Shortage : पुण्यातील रेस्टॉरंट्स अन् हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर, मोठे संकट ओढावले; इराण युद्धाच्या शहराला झळा !

Mumbai: मुंबई-नवी मुंबई प्रवास सुसाट होणार! ऐरोली-मुलुंड फक्त १० मिनिटांत, १३८९ कोटींचा उड्डाणपूल; मार्ग कसा आहे?

Banana Export: केळी निर्यात ठप्प; २००० मजूर परतले! इस्राईल आणि इराण युद्धाचा उत्पादकांसह कामगारांना फटका; दर पडल्याने नुकसान..

SCROLL FOR NEXT