08274
भविष्यात स्वबळावर लढू, जिंकू
प्रभाकर सावंत ः चारही नगराध्यक्ष भाजपचेच असतील
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः चारही नगरपंचायतींवर आमचा नगराध्यक्ष असणार आहे. भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीवर स्वबळावर भाजपची सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पिंगुळी मोरजकरवाडी येथे केले. पिंगुळी मोरजकरवाडी येथील ठाकरे गटाच्या ग्रामपंचायत सदस्य रसिका मोरजकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
जिल्हाध्यक्ष सावंत, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी उपसरपंच मंगेश मस्के, माजी सरपंच राजन पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य शशांक पिंगुळकर, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य साधना माडये, सुभाष सावंत, रसिका मोरजकर, संदीप ठाकूर, नंदकिशोर मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
श्री. सावंत म्हणाले, ‘मोरजकरवाडी येथील ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील. येथील मातीचा रस्ता लवकरच डांबराचा होईल. स्मशानभूमीसह जात पडताळणी प्रश्नासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील. केंद्रात मोदी व राज्यात फडणवीस सरकार असल्यामुळे विकासाला गती आली आहे. जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकाचा विकास होत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकत नाही. याच धोरणाने हे डबल इंजिन विकासाकडे झेप घेत आहे. प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच माझा प्रयत्न राहणार आहे. मार्चपर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू. चारही नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे नगराध्यक्षसह नगरसेवक मोठ्या मतांनी विजयी होतील. आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप स्वबळावर लढवून सत्ता असणार आहे.’ सरपंच आकेरकर यांनी, मोरजकरवाडीचे विकासाचे जे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे सांगितले. उपसरपंच मंगेश मसके यांनी ठाकर समाजाचा जातपडताळणीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.