कोकण

वैद्यक क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करा

CD

08193

वैद्यक क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करा

डॉ. गौरीश केंकरे ः कुडाळात ‘फिजिओथेरपी’बाबत विद्यार्थ्यांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः डॉक्टर म्हणजे माणसातले देव आहेत. या जगातला देव कधी कधी डॉक्टरांच्या रुपाने माणसांच्या मदतीला धावून येतात. डॉक्टर पेशातील व्यक्तींनी आपले कौशल्य वाढविले पाहिजे. वैद्यकीय ज्ञान समजून घेतले तरच त्यातील कौशल्य वाढू शकते, असे प्रतिपादन मुंबई येथील अथर्व ॲबिलिटी सेंटरचे संचालक तथा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे न्यूरो फिजिओथेरेपीस्ट डॉ. गौरीश केंकरे यांनी केले.
डॉ. केंकरे येथील बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी ‘फिजिओथेरपी पेशातील डॉक्टरांसमोरील आव्हाने व डॉक्टरांची जबाबदारी’ या विषयासंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. ते म्हणाले, ‘रुग्णांची काळजी घेताना, त्यांच्यावर उपचार करताना आपण काय ट्रीटमेंट देत आहोत, यापेक्षा त्यांची गरज काय आहे, याचा विचार केला पाहिजे. रुग्णांचा आजारासंदर्भातील इतिहास जाणून घेतला पाहिजे, जेणेकरून त्यांना योग्य उपचार देता येतील.’ यावेळी त्यांनी फिजिओथेरपीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. ‘मेडिकल इथिक्स गाईडलाईन’वर काम करण्याचाही त्यांनी भावी डॉक्टरांना सल्ला दिला. ‘स्पायल कोड इंज्युरी’बाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
आजच्या काळात फिजिओथेरपीची किती गरज आहे, यावर मार्गदर्शन केले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे चालविण्यात येत असलेल्या नेरुर येथील (कै.) यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व रिसर्च सेंटरला भेट देऊन तेथील सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रा. कल्पना भंडारी, बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या प्रा. चैताली बांदेकर, पल्लवी कामत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT