कोकण

-स्पर्धा परीक्षेच्या टप्यावर सह्याद्रीची ऐतिहासिक पायरी

CD

मुलांना शाळेतच स्पर्धा परीक्षेची माहिती द्या
शेखर निकम ः सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह अॅकॅडमीचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ३ ः शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली पाहिजे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि स्पर्धेत टिकून राहता यावे यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह अॅकॅडमी’ने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे, असे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.
सह्याद्री शिक्षणसंस्थेअंतर्गत कार्यरत सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह अॅकॅडमीमार्फत पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी चौथी व सातवीमध्ये करण्यासाठी तयार केलेल्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या मार्गदर्शक अभ्यासक्रम पुस्तकांच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी अॅकॅडमीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम यांनी मार्गदर्शक पुस्तकांची वैशिष्ट्ये उपस्थितांना सांगितली. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती, भाषिक कौशल्य, गणितीय क्षमता, तार्किक विचार आणि सृजनशीलता सिद्ध करणारी महत्त्वाची पायरी असल्याचे त्यांनी सांगितले. सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या ६८व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी सह्याद्री शिक्षणसंस्थेचे ज्येष्ठ संचालक मारुतीराव घाग, शांताराम खानविलकर, मानसिंग महाडीक, उद्योजक प्रशांत निकम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant यांच्या कोर्टात हाय-व्होल्टेज ड्रामा! महिला वकीलाच्या कृतीमुळे कोर्ट मार्शलला बोलवावं लागलं; पुढचा घटनाक्रम धक्कादायक!

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची लाट ओसरली, मात्र गारठा कायम राहणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान?

Swami Samarth Video: स्वामी समर्थ महाराजांचा गूढ प्रवास! भारत खंडातून फिरताना तयार होतो 'ॐ' आकार... प्रत्येक भक्ताने वाचावी अशी माहिती

Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे आज दिल्लीत होणार आगमन ; दौऱ्याकडे जगाचे असणार बारीक लक्ष!

आजचे राशिभविष्य - 04 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT