कोकण

डिगस राणेवाडीत आज दत्त जयंती

CD

डिगस राणेवाडीत
आज दत्त जयंती
कुडाळ ः डिगस येथील सद्‌गुरू गगनगिरी महाराज आश्रम, डिगस-राणेवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. उद्या (ता. ४) सकाळी ७ ते ९ पर्यंत ‘श्रीं’ची पाद्यपूजा व अभिषेक, सकाळी ९ ते १२ हवन व महाआरती, दुपारी १२ ते २.३० पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ३ ते ६ पर्यंत सुचिता राणे यांचे कीर्तन, सायंकाळी ६ ते ७ श्री दत्तजन्म, आरती व प्रसाद, रात्री ८ ते १० पर्यंत समई नृत्य, १० ते ११.३० पर्यंत पालखी सोहळा आणि रात्री १२ वाजता भावई पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ (धामापूर) यांचे दशावतारी नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी (५) सकाळी ९ ते १२ अभिषेक, दुपारी १२ ते १ आरती, तर १ ते २ पर्यंत प्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
.................
माकडांच्या उपद्रवाने
कुडाळवासीय त्रस्त
कुडाळ ः शहरात अनेक ठिकाणी होत असलेल्या माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यासंदर्भात उद्या (ता. ४) सकाळी ११ वाजता वनविभागाला निवेदन देण्यात येणार आहे. शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, बाळा वेंगुर्लेकर, सुशील चिंदरकर, संदीप म्हाडेश्वर, अमित राणे, सत्यवान कांबळी, नितीन सावंत, गुरू गडकर, मेघा सुकी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देऊन वनविभागाचे लक्ष वेधले जाणार आहे. ठाकरे शिवसेना, युवा सेना व महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाट यांनी केले आहे.
..................
वायरी भूतनाथ येथे
आज दत्त जन्मोत्सव
मालवण ः वायरी भूतनाथ येथील प्रदीप वेंगुर्लेकर यांच्या घरासमोरील दत्तस्थानावर उद्या (ता. ४) दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सहस्र चंद्रयोगाचे औचित्य साधून शुक्रवारी (५) सायंकाळी ७.३० वाजता गायक जितेंद्र मेखी (मुंबई) यांची भक्तिगीतांची सुरेल मैफल ‘झाली, स्वामीकृपा झाली’ होणार आहे. शनिवारी (६) रात्री दहाला पडद्यावरील संगीत नाटक ‘मत्स्यगंधा’, रविवारी (७) संगीत नाटक ‘शारद्य’, सोमवारी (८) मराठी चित्रपट ‘दशावतार’ दाखविण्यात येणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
.......................
मालडी मठात आज
दत्तजयंती उत्सव
आचरा ः मालडी (ता. मालवण) येथील देवजी बुवा मठात उद्या (ता. ४) दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी पावणेपाचला दाजीबुवा मालवणकर यांच्या श्रीदत्त जन्मोत्सव कीर्तनाने होईल. त्यानंतर सहाला शास्त्रोक्त पद्धतीने पूजा, दत्तमूर्ती पालखीत विराजमान होऊन मंदिर परिसरात प्रदक्षिणा, गाभाऱ्यात आरत्या व गाऱ्हाणे, रात्री साडेआठला महाप्रसाद, साडेनऊला भजने होतील. उपस्थित राहावे, असे आवाहन मालडीवासीयांनी केले आहे.
.....................
सावंतवाडी भडवाडीत
आज दत्तजन्म सोहळा
सावंतवाडी ः भटवाडी येथील वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज आज्ञेने स्थापित श्री दत्त मंदिरात उद्या (ता. ४) दत्तजयंती उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai ATS Raid : मुंबईत एटीएसच्या धाडी; महत्वाच्या तीन ठिकाणी धाड; इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया संघटनेचे कनेक्शन

Vasai Accident: शिकाऊ चालकानं ब्रेकऐवजी एक्सेलेटर दाबला; कारनं ९ जणांना उडवलं; वसईत होळीच्या रात्री थरार

Latest Marathi News Live Update : इंडोनेशियामध्ये ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Viral Video: आश्चर्यकारक तपश्चर्या! होळीच्या धगधगत्या ज्वालांमध्ये तो थेट उतरला… पुढे जे घडलं ते पाहून सगळे थक्क

T20 World Cup: भारतीय संघ वर्ल्ड कप फायनल खेळणार नाही, संजू सॅमसन खेळला म्हणून उपांत्य फेरीत पोहोचले, नाहीतर...

SCROLL FOR NEXT