कोकण

तरुणांनी हॉटेल व्यवसायाकडे वळावे

CD

08249

तरुणांनी हॉटेल व्यवसायाकडे वळावे

डॉ. अमोल राऊळ ः ‘पूर्णब्रह्म पर्व’मध्ये विविध स्पर्धांना प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः हॉटेल व्यवसायात करिअर करण्यासाठी येथील युवा वर्गाची वाटचाल कौतुकास्पद आहे. कोकणातील विद्यार्थी वर्ग आज हॉटेल व्यवसायाकडे वळत आहे. ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन चिकित्सक समूहाच्या पाटकर वर्दे कॉलेजचे मुख्य शेफ डॉ. अमोल राऊळ यांनी केले.
चिकित्सक समूहाच्या पाटकर वर्दे कॉलेज, सॅटेलाइट सेंटर पिंगुळीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पूर्णब्रह्म पर्व ५’चे आयोजन ५ डिसेंबरपर्यंत केले आहे. कालपासून (ता. २) सुरू झालेल्या या महोत्सवात आंतरराज्य विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह गोव्यातील १७ महाविद्यालयांचा सहभाग आहे. आज दुसऱ्या दिवशी पाटकर वर्दे कॉलेजचे सेक्रेटरी डॉ. गुरुनाथ पंडित, मुख्य शिक्षण अधिकारी डॉ. माला खारकर, परीक्षक शेफ इशिजोत सुरीशेफ, भूषण दुगाडे, अद्वैत नेवगी, डॉ. अमोल राऊळ, समन्वयक नोएल फर्नांडिस, समन्वयक अमित गावडे, शेफ क्युरी फर्नांडिस, दीपिका, शशांक आमरे, देवांश देसाई, रोशन मोहंती, भावेश म्हापणकर, कौस्तुभ नाईक, प्रसन्न लाड आदी उपस्थित होते.
डॉ. राऊळ म्हणाले, ‘कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करताना जिद्द, चिकाटी, मेहनत या त्रिसूत्रीसह आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. कुडाळसारख्या भागातून हॉटेल व्यवसायात वाटचाल करत मी पाटकर वर्दे कॉलेजचा नामांकित शेफ बनलो. कोकणातील मुले हॉटेल मॅनेजमेंटमधून मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेली पाहिजेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठी गेली पाच वर्षे ‘पूर्णब्रह्म’सारख्या उपक्रमाचे आयोजन करत आहोत. हॉटेल व्यवसायात वाटचाल करताना त्या क्षेत्राची आवड महत्त्वाची आहे.’
आज फ्लॉवर सेटिंग, नॅपकिन फोल्ड, केक बॉस, क्विझ, सर्व्हिस स्प्रिंट, फ्लेमलेस कुकिंग, रील मेकिंग या स्पर्धा घेण्यात आल्या. उद्या (ता. ४) दहावी, बारावी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ, फ्लेमलेस कुकिंग, स्पोर्ट रिले, रील मेकिंग, एकपात्री अभिनय, प्लेट पेंटिंग स्पर्धा घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway : रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८,९७० कोटींचा खर्च

Excise Law: सिगारेटसह पान मसाल्याच्या किमती वाढणार! लोकसभेत मोठा निर्णय; हे विधेयक का आणले गेले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील सर्व शाळा उद्या बंद

Malegaon News : घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले; प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले

Viral Video: 'सनम तेरी कसम...' गाण्यावर डान्स करणाऱ्या नव वधु-वराचा व्हिडिओ तुफान व्हायरल, यूजर्सच्या मजेदार कमेंटचा पाऊस

SCROLL FOR NEXT