कोकण

दिव्यांगांनी लुटला झिपलाईन, पॅरामोटरचा आनंद

CD

rat३p१५.jpg-
२५O०८२४७
रत्नागिरी : मालगुंड येथे पॅरामोटरचा आनंद लुटण्यासाठी स्वार झालेल्या वर्षाराणी सावंत. दुसऱ्या छायाचित्रात झिपलाईन येथे सुषमा सावंत, वर्षाराणी सावंत, स्मिता पाटील आदी.
-------
दिव्यांगांनी लुटला झिपलाईन, पॅरामोटरचा आनंद
चेहऱ्यावर उत्साह ; रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : अपंगत्वामुळे व्हीलचेअर हे जग बनलेल्या वर्षाराणी सावंत, दिव्यांग सुषमा सावंत व भंडारपुळे येथील स्मिता पाटील यांना रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने अनोखी भेट दिली. आरे-वारे येथे झिपलाईन आणि मालगुंड येथे पॅरामोटर या धाडसी खेळांचा आनंद या दोघींनी घेतला. यामुळे या दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले.
दिव्यांगांना अशा प्रकारे पर्यटनस्थळी जाणेच खूप कठीण असते; परंतु दिव्यांगांसाठी सर्व ती मदत करणाऱ्या रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. वर्षाराणी श्रीपत सावंत (रा. मु. पो. निर्वाळ बहिरीचीवाडी, ता. चिपळूण) हिला वयाच्या २१व्या वर्षापासून मस्कुलर डिस्ट्रोफी या आजाराने अपंगत्व आले. हळूहळू अंगातली सर्व ताकद कमी होऊ लागली, शरीराचा तोल जाऊ लागला, पायाचे सांधे दुखायला लागले तसे चालणेही कमी झाले. हातात काठी घेऊन चालत होत्या. तशा परिस्थितीतही पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. आता घराबाहेर पडता येत नाही. घरातल्या घरातच हळूहळू स्वत:ची कामे करतात. बऱ्‍याच कामात आईची मदत लागते. अशा परिस्थितीत रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने तिला पर्यटन सफर घडवली व साहसी खेळांचा आनंद दिला. यासाठी आरे-वारे येथील ओशन फ्लाय झिपलाइनचे खूप सहकार्य लाभले.
या वेळी सूरज चव्हाण, अर्पित भोसले, अर्सलान पटेल, आदित्य पाटील, रसिका वारेकर, तीर्था शिवलकर, सिद्धेश पालिये व जितेंद्र शिंदे आणि रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सादिक नाकाडे व सदस्य समीर नाकाडे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway : रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८,९७० कोटींचा खर्च

Excise Law: सिगारेटसह पान मसाल्याच्या किमती वाढणार! लोकसभेत मोठा निर्णय; हे विधेयक का आणले गेले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील सर्व शाळा उद्या बंद

Malegaon News : घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले; प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले

Viral Video: 'सनम तेरी कसम...' गाण्यावर डान्स करणाऱ्या नव वधु-वराचा व्हिडिओ तुफान व्हायरल, यूजर्सच्या मजेदार कमेंटचा पाऊस

SCROLL FOR NEXT