-rat३p१८.jpg-
२५O०८२५१
रत्नागिरी : आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेत दिव्यांग दिनानिमित्त आज आमचा दिवस आमचा आनंद मनोरंजनात्मक खेळातील विजेते विद्यार्थी व मागे उभे मान्यवर.
----------
‘आमचा दिवस, आमचा आनंद’ जल्लोषात साजरा
आविष्कार संस्था ; जागतिक दिव्यांग दिनी मनोरंजनात्मक खेळ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांकरिता आमचा दिवस आमचा आनंद या मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने व जल्लोषपूर्ण सहभाग घेऊन आनंद साजरा केला.
जांभळा रंग दिव्यांग व्यक्तींना समावेशिता आणि समानतेचे प्रतीक मानले जाते. याकरिता जांभळ्या रंगाची संकल्पना ठेवून सर्व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले होते. आमचा दिवस आमचा आनंद या मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनीता शिरभाते यांच्या हस्ते करण्यात आले. संगीत शंकू या खेळाचे लायन्स क्लब सचिव शरद नागवेकर, ब्लॉक जंप या खेळाचे उद्घाटन ओवन्स कॉर्निंग इंडियाचे मुख्य अभियंता अविनाश खानविलकर यांनी केले.
सीएसआर समन्वयक (ओवन्स कॉर्निंग इंडिया मुंबई) सागर खरात, लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय पटवर्धन, शिल्पा पानवलकर, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयातील दीपक आंबवले, सामाजिक कार्यकर्ता संजय बलाढ्ये, फिजिओथेरपिस्ट डॉ. जुई मुकादम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरित करण्यात आले.
दिव्यांग दिनाचे औचित्य साधून कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीकरिता आवश्यक उपकरणाचे वितरण करण्यात आले. ही उपकरणे ओवन्स कॉर्निंग इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून देणगी स्वरूपात देण्यात आले. खानविलकर व खरात यांनी ही उपकरणे संस्थाध्यक्ष सीए बिपिन शहा यांच्याकडे सुपूर्द केली. फिजिओथेरपिस्ट जुई मुकादम यांनी सर्व उपकरणांचे उपयोग सांगून प्रात्यक्षिक दाखवले. संस्था कोषाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सदस्य संपदा जोशी, उद्योजक मानस देसाई उपस्थित होते. कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.